एखादी बाई तुरूंगात टाकली म्हणजे… जयकुमार गोरेंवर टीका करताना जानकरांची जीभ घसरली

Uttamrao Jankar यांची भाजप आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.

Uttamrao Jankar

Uttamrao Jankar’s tongue slipped while criticizing Jayakumar Gore : सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोलापूरमध्ये देखील निवडणुकांसाठी राजकीय वातावरण यादरम्यान भाजप आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय म्हणाले उत्तमराव जानकर?

भाजप आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, एखादी बाई तुरूंगात टाकली म्हणजे गडी होत नाही, इथं लढाई गड्यांसोबत आहे हिजड्यांसोबत नाही. तुम्हाला लढायला बाई तुरूंगात टाकावी लागली, तेव्हा तुम्ही गडी आणि पालकमंत्री झालात. असं म्हणत जानकर यांनी टीका केली. मात्र त्यांची जीभ घरसरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गोरे आणि जानकर यांच्यातील रंगलेलं वाकयुद्ध थांबायला तयार नसल्याचं यावेळी पुन्हा पाहायला मिळालं.

फॅब्रिकेशन व्यवसायिकाकडून दृश्यम स्टाईल खून; पत्नीला संपवलं, भट्टीत जाळून राखही नदीत फेकली

दरम्यान या अगोदर देखील जयकुमार गोरेंवर बोलताना उत्तमराव जानकर यांनी थेट कमरेतून मोडून काढेन अशी धमकी दिली होती. त्याला गोरे यांनी आम्ही कंबर मोडाच्या नादी लागत नाही. आम्ही कमरेखालीच मारतो असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. यावेळी जानकरांवर बोलताना गोरे यांची देखील जीभ घसरली होती.

follow us