शिक्षण मंत्री झोपले का? आमदार बांगरांवर कारवाई करा; ‘त्या’ व्हिडिओवरून विरोधक आक्रमक
Vijay Wadettiwar On MLA Santosh Bangar : शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अजब सल्ला दिला. तुमचे आईवडील मला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवूच नका, असं बांगर म्हणाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी आमदार बांगर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळं बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली.
Aata Vel Zaali: वयस्कांच्या अस्तित्वाची गोष्ट; ‘आता वेळ झाली’चा भावूक करणारा ट्रेलर रिलीज
आयोगाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या संतोष बांगरवर निवडणूक आयोग कारवाई करेल का? राज्यातील शिक्षण मंत्री स्वत:च्या पक्षातील आमदार शाळेत जाऊन हे सगळे प्रकार असतांना झोपले आहेत का? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला.
मॉरीसचा बॉडीगार्ड म्हणतो, मला फसवलंय; अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी!
वडेट्टीवार यांनी आमदार बांगर यांच्या वक्तव्याचा दखल घेत त्यांच्यावर निशाणा साधला. वडेट्टीवार यांनी ट्विट करत लिहिलं की, तुमच्या आईबापाला मला मतदान करायला लावा. नाही केल्यास दोन दिवस जेऊ ना, असा दम विद्यार्थ्यांना देतांना शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदार संतोष बांगर या व्हिडिओमध्ये दिसत आहे. निवडणूक प्रचारात किंवा निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे आदेश असतानाही सत्ताधारी पक्षातील आणि आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आमदार हे सगळं करतोय ते सुध्दा शाळेत जाऊन… आयोगाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या संतोष बांगरवर निवडणूक आयोग कारवाई करेल का? राज्यातील शिक्षण मंत्री स्वत:च्या पक्षाताील आमदार शाळेत जाऊन हे सगळे प्रकार असतांना झोपले आहेत का? हे योग्य आहे काय़ असा सवाल वटेट्टीवार यांनी केला.
तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा… नाही केल्यास दोन दिवस जेवण करू नका, असा दम विद्यार्थ्यांना देताना शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदार संतोष बांगर या व्हिडिओत दिसत आहे.
निवडणुकीत किंवा निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात प्रचारात लहान मुलांचा वापर करू… pic.twitter.com/x75XtS0Stl
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 10, 2024
तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही बांगर यांच्यावर टीका केली. रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, यांना मतदान कऱण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबबद्दल आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.
यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे! pic.twitter.com/eF5a193BDW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2024
नेमंक काय म्हणाले बांगर?
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत बांगर म्हणत आहेत की, ‘तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान न करता दुसरीकडे मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका. आई-वडिलांनी जर विचारलं का जेवयाचं नाही? तर त्यांना सांगायच आमदार संतोष बांगरला मदतान करा तेव्हा जेवते. नाहीतर जेवत नाही… संतोष बांगरला मत देण्यासाठी तुम्ही आग्रह धरा, असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.