Waqu Board Bill : संसदेत वक्फ बोर्ड विधेयक सादर; अबू आझमींचा सरकारला उलट सवाल…

Waqu Board Bill : संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक (Waqf Board Bill) चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडण्यात आलंय. या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळालंय. आता अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Aazami) यांनी सरकारलाच उलट सवाल केलायं. वक्फ बोर्डाच्या जमीनींवर सरकारचा काहीही अधिकार नाही, सरकारने दिलंच नाहीतर सरकार यामध्ये का येतंय? असा उलट सवाल आझमी यांनी केलायं.
अनैतिक संबंधात अडथळा; प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पुणे पोलिसांनी 3 तासांत लावला छडा
पुढे बोलताना आझमी म्हणाले, वक्फ बोर्डाच्या जमीनी आमच्या पूर्वजांनी वक्फ केलेल्या आहेत. या जमीनी शाळा, कॉलेज, अनाथाश्रम, दर्गा, मदरसांसाठी दिलेल्या आहेत. अशा जमीनींवर सरकारचा कोणताही अधिकार नाही. सध्याच्या सरकारची नियमावली मुस्लिमांसाठी योग्य नसून इथं जन्माला आलेल्या मुस्लिमांना तुम्ही नागरिकत्व मागत आहात, स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांना तुम्ही प्रमाणपत्र मागत असल्याची टीका आझमी यांनी केलीयं.
पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! ‘अबीर गुलाल’ला मनसेचा विरोध; ‘सामना आमच्याशी आहे…’
तसेच सरकारकडून मुसलमानांना बरबाद करण्यासाठीच हे सर्व सुरु असून आमचा 1400 वर्षांपूर्वीचा विवाह कायदा देखील सरकार संपवू पाहत आहे. तीन तलाक कायदा मुस्लिमांना तुरुंगात टाकण्यासाठीच आणला असल्याचं आझमींनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, वक्फ बोर्ड विधेयकाचा प्रस्तावित मसुदा संयुक्त संसदीय समितीने (JPC) बहुमताने स्वीकारला. तर विरोधी पक्षातील खासदारांना विरोधातील मते मांडण्यासाठी दुपारी ४ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. संयुक्त संसदीय समितीच्या शेवटच्या बैठकीत विधेयकाच्या मसुद्याला मंजूरी देण्यासाठी मतदान घेण्यात आले.
यावेळी १४ जणांनी विधेयकाच्या बाजूने तर ११ जणांनी विरोधात मतदान केले. या समितीमध्ये एकूण ३१ खासदारांचा समावेश आहे. ६५५ पानांचा मसुदा वाचण्यासाठी आणि त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी अतिशय कमी वेळ दिला, असा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी घेतला. त्यांच्याकडे मसुदा देण्यात आला आणि काल सकाळी १० वाजता यावरील आक्षेप मागितले गेले असल्याचा आरोपही विरोधी बाकावरील खासदारांनी केला.