आम्ही लढत राहू; सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळताच शरद पवारांची प्रतिक्रिया
NCP Crisis : शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. तसेच आठवडाभरात निवडणूक आयोगाकडून शरद पवाराला गटाला पक्ष चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे राजकीय संघर्षात शरद पवार गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावर शरद पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट मग आमच्यावरच अन्याय का’; सुळेंचा शाहांना खडा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय!, असा प्रश्न देखील उपस्थित केला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
तिकीट कुणाला द्यायचे ते पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल, लोकांनी आकाशात पतंग उडवू नये; देवधरांनी फटकारले
आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय ECI ला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर ७ दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानासाठी आम्ही लढत राहू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार गटाला न्यायालयाने फटकारले
अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. मतदार राजा हा हुशार असून त्याला आपण कोणाला मतदान करतो हे चांगले समजते आहे. कारण याआधी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या नावाला विरोध करण्यात काही अर्थच नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. त्यानंतर आता तीन आठवड्यानंतर सुनावणी पार पडणार आहे.
अजित पवार गटाचा काय युक्तिवाद ?
अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगींच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले, मुकुल रोहतगी तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या आदेशात काय लिहिले. दोन्ही गटांनी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरले नाही. आयोगाचा निष्कर्ष काय आहे की तुम्ही दोघांनी घटना पाळली नाही. फूट वगळून विलीनीकरणाची तरतूद करण्यात आली, त्याचा उद्देश काय होता, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला होता.