‘भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट मग आमच्यावरच अन्याय का’; सुळेंचा शाहांना खडा सवाल

‘भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट मग आमच्यावरच अन्याय का’; सुळेंचा शाहांना खडा सवाल

Supriya Sule On Amit Shah : भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट मग आमच्यावरच आणखी एक अन्याय का? असा खडा सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना केला आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला सुप्रिया सुळे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

Chatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे क्षणचित्रे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला एका गोष्टीचा आनंद वाटला कालच्या अधिवेशनात राष्ट्रवादी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आला नाही, त्यांना कोणी जाऊन काय सांगत हे मला माहित नाही. मी त्यांच्या भाषणाबद्दल नाही बोलू शकत कारण मी लहान आहे, अमित शाह यांचं कर्तृत्व मोठं आहे.पण मी प्रांजलपणे सांगते मी महाविकास आघाडी इंडिया आघाडीकडे बारामती लोकसभेसाठी तिकीट मागत आहे. उद्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मी लोकसभेत जाणार आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या विधानावर काही चर्चा व्हावी असं मला वाटत नसल्याचं स्पष्टीकरण सुळे यांनी दिलं आहे.

इंडिया आघाडीतील पक्षांना घराणेशाहीची चिंता, ठाकरे-पवारांचे उद्दिष्ट फक्त…; अमित शाहांची घणाघाती टीका

तसेच घराणेशाही सर्वच पक्षात आहे. भाजपमध्ये सर्वात जास्त घराणेशाही असून तुमच्याकडे घराणेशाही झाली तर ते तुमचं टॅलेंट आणि आमची घराणेशाही झाली तर हा आमच्यावर आणखी एक अन्याय नाही का? माझ्यावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप नाही माझ्या मतदारसंघात झालेला विकास पाहा, मी जनेतत राहुनच काम करीत असल्याचं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

तुमच्याकडे 200 आमदार असते तर डोकं चालवलं असतं का? आम्ही जनतेच्या विकासाच्या कामाला लागलो असतो…कशाला घर फोडायला पाहिजेत. कशाला ईडी आईसच्या कारवाया करायला पाहिजेत. तुम्ही देशाची सेवा कधी करणार हे सरकार शेतकरी विरोधी आहे. अदृश्य शक्तीवर किती विश्वास ठेवावा हे आपल्यावर अवलंबून असतं अदृश्य शक्ती किती दबाव टाकते याचं आत्मचिंतन करावं. मी त्यांना घाबरत नाही मी का कोणाला घाबरु देश संविधानाने चालतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. दरम्यान, प्रभु श्रीरामाने वडिलांसाठी 14 वर्षे वनवास भोगला हे आमच्या मर्यादा पुरुषोत्तम रामाने केलेले संस्कार आहेत. भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज एक आदर्श नेत्या असल्याचंही सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube