‘ऊन, वारा, पाऊस असला तरी सभा होणारच, अजित पवारांचा इशारा

  • Written By: Published:
24_10_2019 Ajit Pawar_19696689

मुंबई : सत्ताधाऱ्यांविरोधात रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) आज मुंबईत बैठक आयोजित केली. या बैठकीला संबोधित करताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या सभा यशस्वी करण्याचं आवाहन केलं. राज्यात 3 पक्ष एकत्र आल्यानंतर काय परिस्थिती होते हे आपण पाहिलं आहे. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या सभा ओसंडून वाहिल्या पाहिजेत, असं आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी केलं.

अजित पवार यांनी यावेळी पावसातील सभेचा आपल्याला फायदाच होतो असं यावेळी म्हटलं आणि एकच हशा पिकला. “महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात आता ठिकठिकाणी सभा होणार आहेत. सभा ओसंडून वाहिल्या पाहिजेत याची जबाबदारी प्रत्येत कार्यकर्त्याची आहे. मी आज तुम्हाला सांगतो, वादळ असो, पाऊस असो किंवा मग अवकाळी पाऊस असो…सभा होणारच. पाऊस आला तर चांगलंच आहे कारण पावसातली सभा आपल्याला फायदेशीर ठरते, असं अजित पवार म्हणाले.

Devendra Fadanvis : शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो; विधानसभेत फडणवीसांची जोरदार बॅटिंग

महाविकास आघाडीच्या राज्यात सभा नागपूर- १६ एप्रिल, मुंबई- १ मे, पुणे- १४ मे, कोल्हापूर- २८ मे, नाशिक- ३ जून या ठिकाणी येथे सभा होणार आहेत. साताऱ्यामध्ये २०१९ मध्ये श्रीनिवास पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली होती. त्यावेळेस देखील मुसळधार पाऊस सुरू असतानाही शरद पवार यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं होतं. भर पावसात भाषणाच्या शरद पवारांची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियात त्यावेळी चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. इतकंच नव्हे, तर श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. म्हणून सभेमुळे संपूर्ण वातावरण फिरलं होतं आणि पवारांनी आपली जादू दाखवली होती. याच सभेचा धागा पकडत आज अजित पवार यांनी भाष्य केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube