केंद्र सरकार ‘इंडिया’ आघाडीचं नाव बदलणार? शरद पवारांनी दिलं खुलं चॅलेंज…
‘इंडिया’ आघाडीचं नाव कोणीच बदलू शकत नाही, तसा अधिकारच कोणाकडे नाही, या शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारला खुलं चॅलेंजच दिलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, केंद्र सरकारकडून अनेक विधेयके मांडण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे, या अधिवेशनात विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा ‘इंडिया’ शब्द बदलण्याबाबतही विधेयक मांडण्यात येणार असल्याचं शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केलीयं. शरद पवार सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत.
सत्ताधा-यांच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण झाली आहे की, त्यांच्याकडून आता INDIA या शब्दाचा वापरही टाळला जात आहे. जे INDIA या शब्दाला स्वीकारू शकत नाहीत, ते देशवासियांना काय स्वीकारणार… INDIA हा विश्वास आहे प्रत्येक भारतीयाचा, ही ताकद आहे प्रत्येक भारतीयाची! https://t.co/cMXzDHktS5
— NCP (@NCPspeaks) September 5, 2023
जळगावध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना अधिवेशनात ‘इंडिया’ आघाडीचं नाव बदलण्याची चर्चा सुरु असल्याचं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले, “केंद्र सरकारने येत्या 18 सप्टेंबरपासून बोलवलेल्या विशेष अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके मांडणार आहे.
आमदार शिंदेंच्या मतदारंसघात खासदार चिखलीकरांचचं वर्चस्व; बाजार समिती निवडणुकीत केलं चीतपट
अधिवेशनात भारतीय संविधानातून इंडिया शब्द हटवण्यासाठीही विधेयक मांडले जाणार असल्याची चर्चा आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक आणून केंद्र सरकार इंडिया आघाडीतील INDIA हा शब्द बदलण्याच्या तयारीत आहे. कुणीच हे नाव बदलू शकत नाही तसा अधिकारच कुणाकडे नाही, असं शरद पवार(Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे.
विरोधकांकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; अजितदादांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
यासंदर्भात शरद पवार यांनी ट्विटद्वारेही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये पवार म्हणाले, “सत्ताधाऱ्यांच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण झाली आहे की, त्यांच्याकडून आता INDIA या शब्दाचा वापरही टाळला जात आहे. जे INDIA या शब्दाला स्वीकारू शकत नाहीत, ते देशवासियांना काय स्वीकारणार… INDIA हा विश्वास आहे प्रत्येक भारतीयाचा, ही ताकद आहे प्रत्येक भारतीयाची!” असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, अद्याप मला याबाबत कोणतीही माहिती आलेली नसून उद्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी बैठक आयोजित केली असून इंडिया घटक पक्षातल्या नेत्यांना बैठकीला बोलावलं आहे. बैठकीदरम्यान, सर्वच गोष्टींवर चर्चा होणार असल्याचंही शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले आहेत.