बारामतीचा ‘दादा’ बदलणार?; युगेंद्र पवारांचे नाव घेत पवारांनी सुरू केली नवी चर्चा

बारामतीचा ‘दादा’ बदलणार?; युगेंद्र पवारांचे नाव घेत पवारांनी सुरू केली नवी चर्चा

sharad Pawar speech : बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला होता. त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळं बारामतीत अजित पवार गट बॅकफूटवर गेला. दरम्यान, आज शरद पवारांनी थेट युगेंद्र पवारांचं नाव घेत आता युगेंद्रला ताकद देऊ असं सूचक विधान केलं. त्यामुळं बारामतीचा दादा बदलल्याची चर्चा सुरू झाली.

Video : पहिले मोदींचे पाय अन् आता थेट हात; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना झालंय तरी काय? 

शरद पवार यांनी बारामतीतील शेतकरी मेळाव्याला संबोधित करतांना सांगितलं की, लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी बारामतीत काय होणार? याची चर्चा झाली. मी दिल्लीला गेलो तरीही बारामतीची चर्चा असायची. परदेशातही बारामतीची चर्चा झाली. लोकांना चिंता वाटायची. पण बारामतीकर जो निकाल द्यायचा तो, देतात. ज्यावेळी मतपेटी उघडली गेली तेव्हा बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांचा 40 ते 45 हजार मतांनी विजयी केलं. मी तुम्हाला खात्री देतो की देशाच्या लोकसभेत तुमच्या मतदारसंघाचं नाव गाजल्याशिवाय राहणार नाही, असं पवार म्हणाले.

सुरक्षा दलाची मोठी कारवाई; काश्मिरातील चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा 

….त्यांना ताकद देण्याचं काम करू
पुढं बोलतांना पवार म्हणाले, मी तुम्हाला खात्री देतो की कोणाचा किती विरोध झाला असला तरी तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही. मी सध्या अनेक गावांना भेटी देत ​​आहे. गावातील लोक सांगतात निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध झाला. पण मी सांगतो, विरोध झाला तर विसरून जायचं. सुडाचं राजकारण आपप कधी करत नाही. पण एक गोष्ट आहे. बारामती तालुक्यातील जनतेने सिध्द केलं की नेते गावातले होते. पण त्यांचं दुकान चाललं नाही. सामान्य माणसांचं आणि साध्या माणसांचं दुकान जोरात चाललं. त्यामुळं नवी पिढी पुढे आली. त्यामाध्यमातून गावाचा विकास होईल. ही जबाबदारी आमची राहिल. ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, असं सूचक विधान पवारांनी केलं.

युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केल्यानं बारामतीत युगेंद्र पवारांचं अजित पवारांना आव्हान निर्माण झालं. दरम्यान, बारामतीत विधानसभेचा उमेदवार कोण असेल याचा अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत. मात्र, युगेंद्र पवार यांच्याबाबत पवारांनी सूचक विधान केल्यानं बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुध्द पवार असा सामना रंगणार आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत. ते शरयू ॲग्रोचे सीईओ आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे ते कोषाध्यक्षही आहेत. ते बारामती तालुका कुस्तीगीर युनियनचे अध्यक्षही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी शरद पवारांना साथ दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज