Pune Crime : पुण्यातील शाळेत एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला
पुणे : पुणे (Pune Crime) शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सध्या सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे. (Pune Police) पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर (student) कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 17 वर्षीय विद्यार्थ्यांवर दोन तरुणांनी हल्ला केला.
पुण्यात चित्रपटाप्रमाणेच कोयता गॅंग दहशत माजवताना दिसत आहे. आता तर थेट विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला झालेल्या विद्यार्थी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कालच पोलिसांनी या शाळेत जाऊन या गुन्हेगारीबद्दल समुपदेशन केले होते.
समीर पठाण आणि विजय आरडे अशी या 17 वर्षीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. विजय आरडे हा बारावीमध्ये शिकत आहे, पद्मवती भागात राहायला आहे तर समीर पठाण हा तुळशीबागेत काम करतो. पठाण याच्या मैत्रिणीशी विजय बसस्टॉपवर बोलत होता. आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग पठाणला आला आणि त्याने विजयवर कोयता उगारला. या हल्ल्यात शेजारी असलेला विद्यार्थी देखील गंभीर जखमी झाला. वार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली, त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.