‘रक्त सांडण्यापेक्षा, रक्तदान करा’; मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अनोखा उपक्रम

‘रक्त सांडण्यापेक्षा, रक्तदान करा’; मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अनोखा उपक्रम

Muslim satyashodhak mandal : देशभरात बकरी ईदला मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली जाते. त्यामुळे या सणाला कुर्बानी ईद असेही म्हणतात. पण मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 13 वर्षांपासून एक अनोखा उपक्रम राबवत आहे. रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करुन समाजात मानवता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. 2011 पासून मुस्लिम सत्यशोधक मंडळ रक्तदान शिबीराचे आयोजन करत आहे.

धर्मातील परंपरांना समाजाभिमुख करण्याचा विवेक-विज्ञानवादी दृष्टीकोन समोर ठेवून मंडळाने याही वर्षी राज्यव्यापी रक्तदान अभियान सुरु केले आहे. गुरुवार दि. 29 जून ते 5 जुलै या दरम्यान महाराष्ट्रातील विविध शहरांत सामूहिक आणि व्यक्तीगत पातळीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. मुस्लिम समाजात या अभियानाचे स्वागत होत असून महाराष्ट्रभर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

हल्ला झालेली ‘ती’ मुलगी MPSC करणारी नव्हती, पोलिस उपायुक्तांनी सांगितली खरी माहिती…

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले की, इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर हजरत महंमद यांनी तत्कालीन परिस्थितीत मानवजातीच्या कल्याणासाठी इस्लामची स्थापना केली. आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन, समाजाभिमुख आणि मानवताभिमुख सर्व धर्मांनी आपले सण साजरे करणे हे म्हणजे आपल्या संविधानानुसार आवश्यक असलेले मूलभूत नागरी कर्तव्याचे पालन आणि त्याचा आदर करणे होय.

व्हॉट्सॲप यूजर्ससाठी खुशखबर! टेलीग्रामलासारखे मेसेज पिन करता येणार

यावेळी रक्तदान उपक्रमाच्या जोडीलाच ‘अवयवदान-मरणोत्तर देहदान’या विषयावर ‘ऑर्गन अँड बॉडी डोनेशन फेडरेशन’चे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांचे जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उद्या गुरुवारी पुण्यातील बॅ. नाथ पै सभागृह, दांडेकर पूल येथे करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube