Ravindra Dhangekar यांच्या विजयामध्ये Activa गाडीचा वाटा मोठा

Ravindra Dhangekar यांच्या विजयामध्ये Activa गाडीचा वाटा मोठा

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune By-Poll Results 2023) काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांना धूळ चारली. त्यांचा हा विजय महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आता लोक सांगतात महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांची एकजूट हे त्यामागील प्रमुख कारण असले, तरी दुसरेही एक कारण धंगेकर यांच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरले आहे. धंगेकर म्हणजे हाक मारताच मदतीला येणारा कार्यकर्ता. त्यांना ही ओळख त्यांच्या अक्टिवाने मिळवून दिली. त्यामुळे दंगेकर यांच्या विजयात ह्या अक्टिवाचाही मोठा वाटा आहे.

https://www.youtube.com/watch?v=BERIduaZOvg

धंगेकर हे नेहमी अनेकांनाअक्टिवावर प्रवास करताना दिसतात, त्यांचे घर ते महापालिका कार्यालय हा रोजचा प्रवास ही अक्टिवा करते. या अक्टिवावरच ते अनेकांच्या भेटी घेतात मतदारांशी संपर्क ठेवतात. या अक्टिवामुळेच साधा कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळख मिळाली. ही ओळखच या निवडणुकीत त्यांची जमेची बाजू ठरली. त्यांच्या गाडीचा क्रमांक MH-12GU 4593 हा असून अनेकांनी आजच्या विजयानंतर त्यांच्या गाडीसोबत देखील फोटो काढून घेतले.

कोण आहे धंगेकर ? अशा आशयाचे मीन्स देखील आता सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात फिरत आहे. भाजपच्या गणेश बिडकर यांना पराभूत करणारे, गिरीश बापट यांना लढत देणार म्हणूनही त्यांची ओळख सोशल मीडियात फिरत आहे. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसला तब्बल ८ वर्षानंतर पुणे शहरातील विधानसभेसाठी आमदार मिळाला आहे. २०१४ आणि २०१९ या दोन सलग विधानसभा निवडणुका विजयी झालेत. एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता, धंगेकर यांच्या रूपाने आता विधानसभेतील आमदार पुणे शहरात काँग्रेसला मिळाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला याआधी १९९२ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळाला होता. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर काँग्रेसचा पंजा गुलालात नाहून निघाला आहे.

kasba By Poll Result : रवींद्र धंगेकर विजयी; भाजपला धूळ चारली

कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 11 हजार 40 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. सुरुवातीच्या मतमोजणीत फारशी आघाडी नव्हती. त्यानंतर आघाडी वाढत गेली. दहाव्या फेरीनंतर दोघांच्या मतातील फरक मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर धंगेकरांच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली. काही फेऱ्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र, ती काही काळापर्यंतच होती. शेवटच्या फेरीअखेर धंगेकरांना 72 हजार 599 मते मिळाली. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना 61 हजार 771 मते मिळाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube