भारतासाठी एआय ही एक अमूल्य संधी, एचआरनी योग्य उपयोग करावा, यश आपलेच – अमिताभ मिश्रा

AI is invaluable opportunity for India भारतासाठी एआय ही अमूल्य संधी भारताकडे मोठी स्पर्धात्मक आणि मानवी भविष्य सुरक्षित करण्याची क्षमता आहे.

AI Is Invaluable Opportunity For India

AI is invaluable opportunity for India HRs leverage it effectively success will be ours says Amitabh Mishra : भारतासाठी एआय ही एक अमूल्य संधी आहे. भारताकडे मोठी स्पर्धात्मक आणि मानवी भविष्य सुरक्षित करण्याची क्षमता आहे. त्याचा एचआर अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून उपयोग करावा, यश आपलेच आहे असा आत्मविश्वास अदानी पावर लि. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी अमिताभ मिश्रा यांनी व्यक्त केला.

पवारांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रय़त्न, रोहित पवारांनी सांगितला प्लॅन

पुणे, बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड येथे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे बिझनेस स्कूल, एचआर सक्सेस टॉक, आयस्किल बॉक्स आणि कोबज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ उद्योगपती पद्मश्री प्रतापराव पवार, भारत फोर्स कंपनीच्या एच. आर. उपाध्यक्ष डॉ. लीना देशपांडे, पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उद्योजक नरेंद्र लांडगे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, एमइडीसी चे उपाध्यक्ष सचिन इटकर, पीसीईटी प्लेसमेंट डीन डॉ. शीतलकुमार रवंदळे, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव, पीबीएस डीन डॉ. मीनाक्षी त्यागी, इंडस्ट्री इंटरॅक्शन सेल संचालक डॉ. प्रणव चरखा आणि परीक्षक, विविध गटातील पुरस्कार प्राप्त एचआर विविध कंपन्यांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.

मोदींना पंतप्रधानपदी 12 वर्षे पूर्ण! जॉर्जिया मेलोनींपासून श्रीलंकेच्या राष्ट्रपतींपर्यंत जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

यावेळी अमिताभ मिश्रा यांनी सांगितले की, एआय हे निर्णय प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि वेगवान करू शकते, परंतु मानवी संवेदनांची, विवेकाची जागा घेऊ शकत नाही. आपण स्वतःच्या कौशल्य विकासावर आणि मानवी सहयोगावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मानवी सहभागाशिवाय कोणतेही यंत्र, एआय किंवा डिजिटल प्रणाली काम करू शकत नाही. भविष्य हे एआय ची सांगड मानवी बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि नैतिक बुद्धिमत्ता यांचा योग्य वापर आणि समन्वय साधनारांचे असेल असे मार्गदर्शन अदानी पावर लि. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी अमिताभ मिश्रा यांनी केले.

प्रशासनातील ‘हिरोगिरी’वर झगडे यांची नाराजी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर्कवितर्कांना उधाण

विकसित देशासाठी आवश्यक असणाऱ्या भावी पायाभूत सुविधा आता आपल्याकडे आहेत. सरकार देखील सकारात्मक आहे मला पूर्ण आत्मविश्वास आहे की, आजची युवा पिढी विकसित भारतासाठी मुख्य योगदान देईल. आपल्याकडे उद्योगांचे मूल्यांकन करायची करण्याची क्षमता आणि योजना आहे. चैतन्यशील स्टार्ट अप्स परिसंस्था आणि जागतिक दर्जाची डिजिटल पायाभूत सुविधा, तरुण लोकसंख्या, संगणक, स्थानिक पुरवठा साखळी, संगणकाच्या अनेक प्रणाली, बाजारपेठ हे सर्व भारतात उपलब्ध आहे. एआय या माहितीशिवाय दुसरे काही नाही. तुम्ही ही माहिती कशी उपयोगात आणता हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता कामाची शिकण्याची आणि नवनिर्मितीची पद्धत बदलत आहे. भारतासाठी एआय ही एक अमूल्य संधी आहे भारताकडे मोठी स्पर्धात्मक क्षमता आणि मानवी भविष्य सुरक्षित करण्याची क्षमता आहे त्याचा एचआर अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून काम करावे, यश आपलेच आहे असा आत्मविश्वास देखील मिश्रा यांनी यावेळी दिला.

चीनपासून काश्मीरपर्यंत नेहरूंचे ‘ते’ निर्णय भाजपला वाटतात चूक?, वाचा सविस्तर कोणते आहे ते मुद्दे

पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, मानव संसाधन पद्धती आणि नेतृत्वाला सन्मान करणे, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींना नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देणे, नवोपक्रम संघटणात्मक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देऊन त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवणे यासाठी अशा पद्धतीचे पुरस्कार प्रेरणादायी ठरतील असे डॉ. देसाई यांनी सांगितले.

‘देऊळ बंद’ चा नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना सांगितले की, उद्योग परिसंस्थेतील उत्कृष्टता नाविन्यता प्रतिभा विकास आणि संस्थात्मक वाढ यांना चालना देण्यासाठी एचआर व्यावसायिक संस्था आणि उद्योगपतींनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाला मान्यता देणे आणि त्यांचा गौरव करणे या उद्देशाने पीबीएस आणि पीसीयू यांच्या वतीने एच आर एक्सलन्स अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी दिली.

आमच्या जहाजाला आग लागलीय, आम्हाला वाचवा! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर भारतीय खलाशांचा SOS संदेश; अखेर सर्व 24 जण सुरक्षित

भारत फोर्स कंपनीच्या उपाध्यक्ष एचआर उपाध्यक्ष डॉ. लीना देशपांडे यांनी सांगितले की, ज्येष्ठ उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांनी म्हटल्याप्रमाणे, पुढील २० वर्षे ही ‘शिकण्याची वर्षे’ असतील; त्यामुळे पीसीयू सारख्या विद्यापीठांच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे आणि त्यांना भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी व प्रगतीसाठी सज्ज करणे ही एचआरची जबाबदारी आहे. ज्ञान आणि कौशल्ये अद्ययावत ठेवणे विसरू नका; सतत शिकत राहणे हा एक निरंतर प्रवास आहे. एचआर ‘माणसांशी’ संबंधित क्षेत्र आहे आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे असे डॉ. लीना देशपांडे यांनी सांगितले.

आधी प्रेम मग पोक्सो केस आता त्याच्याशीच बांधली लग्नगाठ; सुप्रीम कोर्टनेही वापरला विशेषाधिकार, प्रकरण काय?

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतापराव पवार, कृष्ण प्रकाश, सचिन इटकर, डॉ. गणेश राव यांनी देखील मार्गदर्शन केले. निवडक पुरस्कार प्राप्त एचआर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी त्यागी आणि आभार डॉ. प्रणव चरखा यांनी मानले.

follow us