चंद्रकांत पाटलांच्या विधानावर अजितदादा नाराज; म्हणाले, बोलणं चुकीचच..,
Ajit Pawar On Chandrakant Patil : शरद पवारसाहेब बारामतीत उभे नाहीत तर पराभव करण्याचा विषयच नाही, चंद्रकांत पाटलांचं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर नाराजी व्यक्त केलीयं. शरद पवार (Sharad Pawar) यांचं बारामतीतलं राजकारण संपवायचं हे आमचं टार्गेट असल्याचं विधान चंद्रकात पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर आता अजित पवारांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केलीयं.
अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केलं होतं, त्याला काहीही अर्थ नव्हता. तुम्ही पुण्यात काम पाहा मी बारामतीत पाहतो, असं मी त्यांना म्हणालो होतो. चंद्रकात पाटलांनी असं बोलायला नको होतं. जर शरद पवार बारामतीत उभे नाहीत तर त्यांचा पराभव करण्याचा विषयच येत नाही, चंद्रकांत पाटलांचं बोलणं चुकीचं असून असं बोलायला नको होतं, या शब्दांत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीयं.
कोरोनात टक्केवारी खाणाऱ्या मराठी माणसाचं समर्थन करणार का? रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ संतापल्या..
लोकसभा निवडणुका जाहीर होताच महायुतीच्या नेत्यांकडून बारामती मतदारसंघात मॅरेथॉन बैठका सुरु झाल्या होत्या. भाजपच्या नेत्यांसह चंद्रकांत पाटील बारामतीत तळ ठोकून होते. याचदरम्यान झालेल्या या बैठकीत भाजपच्या नेत्यांसह चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी आम्ही शरद पवार यांना बारामतीमधून संपवणार, त्यांचं राजकारण भाजपला संपवायचं असल्याचं चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यावेळी मात्र, या विधानाची अधिक चर्चा झाली नव्हती. आता खुद्द अजित पवार यांनी या विधानावर नाराजी व्यक्त केलीयं.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडल. या मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. कारण या मतदारसंघात पवार कुटुंबियांमध्ये चुरशीची लढत आहे. महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. आता बारामतीत नेमकं कोणाचं पारडं जड असणार हे येत्या 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.