पुण्यात गुंडाना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देणाऱ्या अजितदादांनी हात झटकले…
Ajit Pawar यांनी अशा कुणालाही उमेदवारी दिली नसल्याचं म्हणत गुन्हेगार उमेदवारांवरून हात झटकले आहेत.
Ajit Pawar on Criminal Candidate in Pune Municiple corporation election : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मंगळवारी 30 डिसेंबर 2025 रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये पुण्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाकडून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीटं दिल्याचं समोर आलं आहे. त्यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला असता. ते त्यांनी अशा कुणालाही उमेदवारी दिली नसल्याचं म्हणत गुन्हेगार उमेदवारांवरून हात झटकले आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना पुण्यामध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीटं दिल्याचं समोर आलं आहे. त्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, असं काहीही नाही. आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये आमची आरपीआय खरात गटासोबत युती झालेली आहे. तशीच यावेळी देखील झाली आहे. त्यामुळे आम्ही काही जागा त्यांना सोडल्या आहेत. त्याबाबत मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी ; अजितदादांनी थेट तारीखच सांगितली
त्यामुळे खरात गट म्हणजे मित्रपक्षांनी त्यांना दिलेल्या जागा कुणाला द्यायच्या हे त्यांच्या हातात असतं. त्यावर मी काहीही सांगू शकत नाही. पण आम्ही मात्र गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही. असं म्हणत अजित पवारांनी गुन्हेगार उमेदवारांवरून हात झटकले आहेत. तर दुसरीकडे यावर माध्यमांशी सचिन खरातांना विचारले असता ते म्हणाले की, यावर मी अजित पवारांशी बोलून सांगेन.
