Maharashtra Politics : ‘शेवटी सत्यजितला ठरवायचं…’, अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

Maharashtra Politics : ‘शेवटी सत्यजितला ठरवायचं…’, अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

पुणे :  नाशिक पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत (Nashik) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) निवडून आल्यावर काँग्रेस आणि भाजपही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Election) अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. त्यातच निवडणुकीच्या काळात भाजप नेत्यांकडून सत्यजीत यांना पाठिंबा देण्याची वक्तव्य केली जात होती. यामुळे आता ही निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली. सत्यजीत तांबे उद्या याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. याबाबतच अजित पवार यांनी सत्यजीत तांबेंना राजकीय भवितव्य पाहण्याचा सल्ला दिला.

अजित पवार म्हणाले की, ” सत्यजीत यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे. त्यांना बरेच वर्षे राज्याच्या राजकारणात काम करायचंय. यामुळे सत्यजीतने या सगळ्याचा विचार करुन निर्णय घ्यावा हे माझं स्पष्ट मत आहे. सत्यजीतने ऐकावं, नाही ऐकावं हा त्यांचा निर्णय आहे. परंतु त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारांशी निगडीत आहे, आणि काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या सेलचे प्रमुख अनेक वर्षे तरुणांना एकत्र करण्याचं काम त्यांनी केलंय.

यामुळे मधल्या दीड महिन्याच्या काळात काय झालं ते त्यांनी मनाला जास्त लावून घेऊ नये, आणि त्यांनी काँग्रेससोबत राहावं. बाळासाहेब थोरात आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांचं त्यांनी ऐकावं. कारण वडीलधाऱ्यांचं आपण ऐकत असतो. यावर काय करायचं हा त्याचा अधिकार असल्याचा सल्ला अजित पवारांनी यावेळी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube