विरोधकांवर टीका करत अजित पवारांचा जनतेचा मोदींना पाठिंबा असल्याचा दावा
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली. त्यांना पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात आपल्याला काय वाटत असं मी विचारलं तर त्यावर लोकांचा प्रतिसाद मोठा आहे असं मोदी आपल्याला म्हणाले असंही अजित पवार म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. तसंच, महाराष्ट्रात एनडीएला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळेल असंही पवार यावेळी म्हणाले.
परदेशी मुद्दा उपस्थित केला
मी ज्यावेळी राजकारणात आलो तेव्हा आम्ही सगळे काँग्रेसमध्ये होतो. पुढे काँग्रेस सरकार आल्यानंतर सोनिया गांधी पंतप्रधान होतील अशी चर्चा होती. पुढे शरद पवार यांनी सोनिया यांच्याबद्दल देशविरोधी भूमिका घेतली. त्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असं म्हणत शरद पवारांनी सोनिया गांधींबद्दल परदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित केला यावर अजित पवार यांनी टीका केली.
राष्ट्रवादी भाजप का नाही?
आज बहुमताला महत्व आहे. आपण आमच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल कुणी बोललं तर लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेना आणि भाजप सोबत निवडणुका लढले होते. परंतु, त्यांना एकमेकांना सांभाळता आलं नाही असा थेट आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. त्यानंतर शिवसेना आमच्यासोबत आली. तेव्हा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होऊ शकते मग राष्ट्रवादी आणि भाजप कसकाय होऊ शकत नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
जनता ऐकत आहे
जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सध्या ऐकत आहे. तसंच, प्रत्येक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएला मतदान का करावं हे सांगत आहेत. काल पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा होती. या सभेला संबोधित करण्यासाठी ते एक तास उशिरा आले. परंतु, यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तसंच, यावेळी महायुतीला मोठं यश मिळेलं असा दावाही अजित पवार यांनी केला आहे.