भाकरी फिरणार! पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?; पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचा राजकारणात मोठ-मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता पुन्हा एकदा भाकरी फिरणार

  • Written By: Published:
Letsupp Image

Parth Pawar May Go Rajyasabha After Sunetra Pawar : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचा राजकारणात मोठ-मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता पुन्हा एकदा भाकरी फिरणार असल्याची माहिती समोर येत असून, पार्थ पवार यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.  शरद पवार हे आज (दि.3) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. दादांच्या अंत्यसंस्कारानंतर पवार बारामतीहून मुंबईला रवाना झाले होते त्यानंतर ते मुंबईतूनच दिल्लीला जाणार होते, मात्र, त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. नेमका हा दौरा कोणत्या कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना मोठा दिलासा, नक्की काय घडलं?

नेमकं काय घडणार?

31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला होता. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या. या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राज्यसभेची ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

पार्थ पवारांना पूर्ण टर्म असलेल्या जागेवार पाठवले जाणार?

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028 ला संपणार होती. मात्र, ही जागा घेण्यापेक्षा पार्थ पवार यांना राज्यसभेची सहा वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. लवकरच राज्यसभेची ही जागा भरली जाईल. त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याची माहिती आहे. . याआधी सुद्धा पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक 2019 मध्ये लढवली होती.  मात्र त्यांचा पराभव झाला होता.

अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी तब्बल 25 लाखांच्या सोन्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

अदानी-शरद पवार भेट

उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक येथे जाऊन दादांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट घेतली. अदानी आणि पवार यांच्यामध्ये 45 मिनिटे चर्चा झाली.  एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. अदानी यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी दिल्ली दौरा रद्द केल्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या घडामोडीत अदानी यांचीही भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

follow us