Amar Mulchandani Arrest : ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ‘ईडी’ने केली जप्त
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दि सेवा विकास सहकारी बँकेचे (Seva Vikas Co-Oprative Bank) माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी (Amar Mulchandani) यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात १० ठिकाणी सक्त वसुली संचालनालयाने शोध मोहीम राबवली. यामध्ये २ कोटी ७२ लाख रुपयांचे सोने आणि हिरे, ४१ लाख रुपयांची रोख रक्कम, चार महागड्या आलिशान कार तसेच डिजिटल डिवाइस त्याचबरोबर महत्त्वाची कागदपत्रे अशी एकूण ३ कोटी १३ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. अमर मुलचंदानी यांच्यासह इतर सात संचालक तसेच दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे.
and has recovered/ seized gold & diamond jewellery worth Rs 2.72 Crore, cash of approx Rs 41 Lacs, 4 high end cars, digital devices and various incriminating documents etc. during the searches.
— ED (@dir_ed) January 30, 2023
सक्त वसुली संचालनालयानेच (Enforcement Directorate) स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. बेहिशोबी शेकडो कोटीचे कर्जवाटप केल्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली. जवळपास ४०० कोटीहून अधिक रकमेचा हा मोठा घोाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मुलचंदानी यांचा फ्लॅट सीझ करण्यात आला आहे. त्यावेळी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुलचंदानी यांच्या कुटुंबातील दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे. एकूण ३ कोटी १३ लाखांची संपत्ती तसेच चार आलिशान महागड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणुकीशी संबंधित पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत तपासात ईडीने शुक्रवारी (दि. २७) रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अमर मुलचंदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसर अशा एकूण १० ठिकाणी ही कारवाई केली होती. त्यानंतर सोमवारी (दि. ३०) रोजी जप्तीची कारवाई करण्यात आली.
पिंपरीतील दि सेवा विकास सहकारी बँकेत संगणमताने बेकायदेशीररित्या, आर्थिक गैरव्यवहार, सहा शाखा अचानक बंद करणे, तसेच जवळपास ४०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला असल्याने आरबीआयने कारवाई केली होती. तसेच दोन महिन्यांपूर्वी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँक गैरव्यवहार प्रकरणी इडीने कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत होती. त्यामुळेच ही करवाई करण्यात आली आहे.
अमर मुलचंदानी यांच्यासह दोन महिला तसेच इतर ७ संचालकांना अटक करण्यात आली असून त्यांची पिंपरी न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.