आपल्याला जिंकण्याची सवय आहेच; मात्र, शिवसेनेतून फुटलेले गद्दार गाडून निवडून यायचय -अंबादास दानवे
Shivsankalp Melava :
शिवसेनेला निवडून येण्याची सवय आहेच. मात्र, आपल्यातून गेलेल्या गद्दारांना गाडून निवडून येणं महत्वाचं आहे अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभेच रणशिंग फुंकलं आहे. (Pune) ते पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त घर बांधणार; राहुल गांधींची मोठी घोषणा
आज महाराष्ट्र पाहिला तर गुन्हेगारीमध्ये सर्वात वर आलेला आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर बिहारच्या नंतर लागतो ही दुर्दैवी परिस्थिती आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी एक यादीच वाचून दाखवली. त्यामध्ये अनेक गुन्ह्यांचा पाढाच त्यांनी वाचला आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री संभाजीनगर जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांना चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले ही कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे यांची लोकप्रियता पाहा असंही ते यावेळी म्हणाले.
अतिवृष्टीमुळे धरणांतून विसर्ग, मात्र पाऊस अन् धरणसाठ्याचं गणित नेमकं काय? जाणून घ्या सविस्तर
अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दाली
यावेळी बोलतांना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मी अमित शाहांना यापुढं अहमद शाह अब्दालीच म्हणणार. मला तुम्ही नकली संतान म्हणालात तेव्हा लाज नाही वाटली. मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत, मग तुम्ही अहमद शाह अब्दाली आहात, हे बोलायला मी का घाबरू? हा अहमद शाह पाहिजे की, भगवा हातात घेतलेला शिवसैनिक पाहिजे? हे आता जनतेने ठरवावे, असंही ठाकरेंनी म्हणाले.
फडणवीसांवरही डागलं टीकास्त्र
दोन दिवसांपूर्वी मी बोललो काहींना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मात्र, मी कोणालाही आव्हान देत नाही. नादाला लागण्याइतके तुमची कुवत नाही. मी कोणत्याही व्यक्तीला नाही, पक्षाला बोलतोय, असं म्हणत ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
अयोध्येतील राम मंदीर गळतंय. संसद भवन गळतंय. कारण संसद भवन बांधणारा काँट्रॅक्टर गुजरातचाच असल्याची माझी माहिती आहे. एक वर्ष झालं बांधकामाला. मोदी अजूनही काँग्रेसला हिशोब मागतात. संसद भवनाचा हिशोब आधी द्या. तुमचं सगळंच गळतंय मग याला गळती सरकार म्हणायचं. आमचं पाप यांना (भाजप) आम्ही हिंदुत्वाच्या वेडापायी पाठिंबा दिला होता असे उद्धव ठाकरे म्हणाले.