हवेली बाजार समितीत भाजपच्या दोन तर राष्ट्रवादीच्या दोन जागा; चुरस आणखी शिगेला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T123730.248

APMC Election Result 2023 :  संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात धक्कादायक निकाल लागला आहे. सुरुवातीच्या निकालात ग्रामपंचायत गटातील चारपैकी दोन गटात भाजपने तर दोन गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.

ग्रामपंचायत गटातून सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलमधील सुदर्शन जयप्रकाश चौधरी व रवींद्र नारायणरावर कंद या दोघांनी बाजी मारली आहे. याच गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे रामकृष्ण हेमचंद्र सातव व आबासाहेब कोंडीबा आबनावे हे दोन उमेदावर विजयी झाले आहेत.

18 पैकी 18 उमदेवार विजयी, वडवणीत मविआची एकहाती सत्ता, पंकजा मुंडेंना धक्का

सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

त्यामुळे आज मतदार कोणाला कौल मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतमोजणी होत आहे.

Tags

follow us