Ashok Chavhan : भाजपच्या ‘वापरा आणि फेकून द्या’ धोरणाला कसब्याची जनता धडा शिकवेल!

Ashok Chavhan : भाजपच्या ‘वापरा आणि फेकून द्या’ धोरणाला कसब्याची जनता धडा शिकवेल!

पुणे : भाजपने (BJP) पोटनिवडणुकीसाठी कोणता उमेदवार द्यावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, पक्षासाठी ज्या लोकांनी आपलं आयुष्य खर्ची केले. त्या लोकांना फक्त वापरा आणि फेकून द्या, हीच निती भाजप राबवते. आजारी असतानाही मतदानासाठी मुक्ता टिळक मुंबईला गेल्या होत्या. एवढा त्याग करूनही कसबा मतदार संघ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भाजपने टिळक कुटुंबातील (Tilak Family) उमेदवार न देता दुसराच उमेदवार दिला. त्यामुळे भाजपची निती ही फक्त गरज असेल तर वापरा आणि फेकून द्या, हीच राहिली आहे. मात्र, आता कसबा मतदार संघातील मतदार भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी भाजपवर केला.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले की, टिळक कुटुंबाला उमेदवारी नाकारून या कुटुंबावर भाजपने मोठा अन्याय केला आहे. वापरा आणि फेकून द्या ही वृत्ती भाजपला कधीही पोसणारी नाही. त्यामुळे भाजपला या पोटनिवडणुकीत कसब्याची जनता निश्चितपणे दाखवून देईल.

टिळकांच्या कुटुंबावरील अन्याय कसब्यातील जनता कदाफी सहन करणार नाही. त्यामुळे भाजपला या पोटनिवडणुकीत धडा शिकवला जाईल. टिळकांच्या कुटुंबाचे अवमान करण्याचे काम भाजप करत आहे. मात्र, त्यांचा अवमान मतदार सहन करणार नाही. हे भाजपने लक्षात घ्यावे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube