नेमकं चाललंय काय? पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Nasrapur Case : पुण्यातील भोर तालुक्याती नसरापूर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याने संपूर्ण
Nasrapur Case : पुण्यातील भोर तालुक्याती नसरापूर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणात आरोपीला फाशी होईपर्यंत लढणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर दुसरीकडे आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटनासमोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पर्वती येथे एका 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पर्वती भागात 9 वर्षीय मुलीवर 50 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतुु संशय आल्याने त्या भागातील काही लोक घटनास्थळाकडे पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच नागरिक चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत होती. सध्या पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर (Parvati Police Station) ठिय्या आंदोलन केलं. तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे नसरापूर प्रकरणात (Nasrapur Case) देखील तपास सुरु असून लवकरच आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देण्यात येऊ नये – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येवू नये, अशी तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत केली.
आज कोणत्या राशींना होणार लाभ, जाणून घ्या कसा राहणार दिवस?
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या पार्श्वभूमीवर, अशा गुन्ह्यांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देण्यात येवू नये, अशी कायद्यात तरतूद करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाऊन व्यवस्थेबाबत विश्वास निर्माण होईल. महिलांच्या सुरक्षेबाबत कडक धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.