Congress अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर ?
पुणे : पुणे शहरातील कॉंग्रेस (Congress) पक्षाचे अविनाश बागवे (Avinash Bagve) हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पुणे महापालिकेच्या राजकारणात आणि रस्त्यावरच्या आंदोलनात सक्रीयपणे भाग घेणारा चेहरा गमावण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. अविनाश बागवे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची चर्चा देखील पक्षात आहे. बागवे यांच्याच प्रभागातील रशीद शेख यांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता पक्षात प्रवेश घेण्यात आला आहे. एकीकडे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत हक्काची जागा आणि सत्यजित तांबे यांच्यासारखा युवा नेता कॉंग्रेसने गमावला आहे. तर आता दुसरीकडे अविनाश बागवे यांच्यामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. लवकरच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अविनाश बागवे भाजपात प्रवेश करतील, असे सूत्रांची माहिती आहे.
अविनाश बागवे आणि भाजपा पदाधिकारी यांच्यात लक्की काय बोलणी झाली. हे अद्याप समजू शकले नसले तरी येत्या ४/५ दिवसांत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहर आणि परिसरात त्यांनी केलेल्या आंदोलनांची संख्या सर्वात जास्त आहे.
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दररोज राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपाच्या उमेदवाराशी प्रमुख लढत देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने याच मतदार संघातील भाजपात गेलेल्या एका माजी नगरसेवकाला आज पुन्हा कॉंग्रेसमध्ये खेचण्यात यश मिळविले आहे. तर दुसरीकडे या ‘शहास काटशह’म्हणून भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट कॉंग्रेसच्या युवा माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याशी त्यांच्या राहत्या घरी जाऊन संपर्क केला आहे.