Chinchwad by-poll : म्हणून राहुल कलाटे यांच्या विरोधात Chinchwad मध्ये बॅनर बाजी

Chinchwad by-poll : म्हणून राहुल कलाटे यांच्या विरोधात Chinchwad मध्ये बॅनर बाजी

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad By Poll) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी या निवडणुकीतून माघार घेतली नाही आहे. कलाटे यांचं मन वळविण्यात मविआ नेत्यांना यश आले नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक त्रिशंकू होणार आहे. मात्र यामुळे आता चिंचवड मध्ये कलाटे यांच्या विरोधात बॅनर बाजी करण्यात आली आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. याठिकाणी पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून 26 फेब्रुवारी रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

दरम्यान या जागेसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवड मतदारसंघात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील निवडणुकीतून माघार घेतली नाही आहे.

राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका हा महाविकास आघाडीला बसण्याची शक्यात आहे. राहुल कलाटे यांनी आपली उमदेवारी मागे घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

एकीकडे राजकारण तापत असताना दुसरीकडे नुकतेच राहुल कलाटे यांच्याविरोधात अज्ञात व्यक्तीने चिंचवडमध्ये बॅनर लावले असून, नाव न घेता राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. खरा शिवसैनिक नावाने हे बॅनर लावण्यात आले आहेत.

नेमकं काय आहे बॅनरवर ?
‘एका अपक्षाची गद्दारी खोक्यातून, नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी एकदम ओक्के डोक्यातून- खरा शिवसैनिक’ अशा अशायाच बॅनर मतदारसंघात दिसून आलं आहे. दरम्यान आता या बॅनर वॉरवरून पुन्हा एकदा चिंचवड मतदारसंघात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube