मिटकरी स्टेजवर असतील तर मी येणार नाही; खासदार मेधा कुलकर्णींनी सांगिंतली ‘ती’ घटना
BJP MP Medha Kulkarni : साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. चुका आपल्या असतील तर ऐकून घेऊन त्या दुरुस्त करणही आपलंच काम आहे. मात्र, विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही. (Medha Kulkarni) म्हणूनच पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्टा करणारे आमदार अमोल मिटकरी ज्या व्यासपीठावर असतील त्या व्यासपीठावर मी जाणार नाही अशी ठोस भूमिका भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडली. (Amol Mitkari) त्याचवेळी त्यांनी आमदार जितेंद्रर आव्हाड यांच्यावरही टीका केली. (BJP) त्या सांगली येथे एका आयोजीत कार्यक्रमात बोलत होत्या. दरम्यान, अमोल मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते, त्या स्टेजवर मी येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर मिटकरी त्या सभेला आलेच नाही अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी! आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अखेर अटक
नकारात्मकता नको
खासदार कुलकर्णी म्हणाल्या, मी इथे सत्कार घ्यायला आले नाही तर जिथे आपल्याला त्रास होत असेल तेथे ब्राम्हण समाजाने व्यक्त झालं पाहिजे, हे सांगायला आले आहे. आपल्याबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळी टीका होते. आपल्याबद्दल नकारात्मकतेची मोठी भावना असते. ती नकारात्मकता आपल्या वर्तणुकीतून नाहीशी करण्याचा प्रयत्न करणं हे आपले काम आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन देशाला पुढे न्यायचं आहे.असंही त्या म्हणाल्या आहेत.
देशाला पुढे नेऊया
देशाला पुढे नेण्यासाठीच्या कामासाठी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरणार नाहीत. देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचं आहे. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया असं आवाहनही कुलकर्णी यांनी केलं. ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही असा इशाराच मेधा कुलकर्णी यांनी दिला. ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. त्यांच्यावर विविध कारणातून टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका व नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा असंही त्या म्हणाल्या आहेत.
मुंबईकरांची आजही धावपळ; मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, सुमारे १६१ लोकल फेऱ्या रद्द
मान्यवरांची उपस्थिती
सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत पुष्करसिंह पेशवे (सरकार) हे होते. या वेळी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, श्रीमंत राजलक्ष्मी पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे-गुरुजी, विश्राम कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. येथील गणपती मंदिर परिसरातील श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी विविध स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्राह्मण समाजातील व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला.