Kasba byelection : हा बोर्ड पाहून भाजपचे टेन्शन वाढले

  • Written By: Published:
Kasba byelection : हा बोर्ड पाहून भाजपचे टेन्शन वाढले

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पक्षावर (BJP) नाराज असल्याची चर्चा थांबायचे नाव घेत नसून अनेक वेगवेगळ्या कृत्यांनी ही नाराजी पुढे येत आहे. नारायण पेठ येथील मोदी गणपती मंदिरा (Modi Ganapati Temple) शेजारी असाच एक फलक लागला असून त्यातून भाजपला योग्य तो संदेश देण्याचा उद्योग काही मंडळींनी केला असे दिसून येते. आता हा फलक ब्राह्मण समाजातील कोणत्या मंडळींनी लावला किंवा भाजपच्या विरोधकांनीच लावला यावर आता चर्चा घडत आहेत.

कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा आणि तोच आमच्याकडून काढला आता आम्ही दाबणार नोटा (NOTA) असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे. या फलकावर एका बटूचे छायाचित्रही लावण्यात आले आहे. त्यातून योग्य तो संदेश जाईल याची दक्षता घेण्यात आली आहे.

कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाज हा 13 ते 15 टक्के असून त्यांची एकूण संख्या ही सुमारे 30000 पर्यंत आहे असे सांगण्यात येते. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरातील व्यक्तींना उमेदवारी नाकारत आणि त्या जागी हेमंत रासने यांना भाजपने संधी दिली तेव्हापासून असे फलक वारंवार लावण्यात येत आहेत ब्राह्मण समाजाला डावलले म्हणून हिंदू महासंघाचे आनंद दवे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांना पाठिंबा देण्याची भाषा करण्या ऐवजी आमची कोणताही उमेदवार पसंत नाही असे दाखवत नोटाची बटणे दाबणार असल्याचे हा फलक सांगत आहे.

BJP : अन् भाजप कार्यकारिणीत निघाली अनेकांच्या मनातली खदखद.. ; पहा, काय घडले ? 

कसबा मतदारसंघातील सदाशिव, नारायण आणि शुक्रवार या तीन पेठात ब्राह्मण समाजाची मते बहुसंख्य आहेत. ही मते बाहेर काढणे आणि त्यांना भाजपला मत देण्यासाठी प्रवृत्त करणे अशी दोन आव्हाने भाजप समोर आहेत या पेठातील बहुतांश ब्राह्मण कुटुंबे ही शहराच्या इतर भागात वास्तव्यास गेली असल्याने त्यांना मतदानास आणणे यावर आता भाजपचे नियोजन सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा यासाठी प्रचारात उतरल्याचे सांगण्यात येत आहे तरी असे नाराजीचे फलक वारंवार लागत असल्याने भाजप समोर रोज नव्हे टेन्शन उभे राहत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube