Chandrakant Patil : ‘त्या’ जबाबदारीमुळे ‘ते’ उमेदवारीतून बाहेर गेले असे होत नाही!

Chandrakant Patil : ‘त्या’ जबाबदारीमुळे ‘ते’ उमेदवारीतून बाहेर गेले असे होत नाही!

पुणे : संघटनात्मक जबाबदारी दिली म्हणून कुणाल टिळक निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले असे होत नाही, असे स्पष्ट करत भाजपचे आमदार तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, तर माधुरी मिसाळ यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांना विनंती पत्र दिले आहेत. राज्यस्तरीय नेत्यांशी आमचे लोकं बोलत आहेत. ५० टक्के वाटतं की निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यताही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आमदार मुक्ता टिळक, तर चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपची आज महत्वाची एक बैठक पार पडली. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे सहयोगी पक्ष बाळासाहेबची शिवसेना, आरपीआय (आठवले गट) यांच्यासह विविध संघटना आणि कसबा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत यांनी मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना भाजपने नुकतीच प्रवक्तेपदी नेमणूक केली. त्यामुळे ते उमेजवारीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा सुरु असल्याने चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघ या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी अनुक्रमे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाने आमच्या घरातच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात उमेदवारीची माळ टिळक-जगताप कुटुंबालाच मिळते की अन्य कोणाला मिळते याबाबत उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, नावांची यादी तयार होत आहे आणि त प्रदेशाकडे जाईल. ६ तारखेला अर्ज भरण्यासाठी वेळ ठरली आहे. सकाळी ११ वाजता कसबा आणि १ वाजता चिंचवडसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे. पक्षाची जबाबदारी आणि निवडणुका वेगळ्या गोष्टी आहेत. ६ तारखेला उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची तारीख आहे यावेळी हे सगळे हजर असतील. आमच्याकडे कोणीही नाराज नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube