Chandrashekhar Bavankule : पदवीधरमध्ये भाजप हरल्याचा रंग दिला जातोय…
पुणे : शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणूक आणि काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या वेगवेगळ्या आहेत. दोन्हीचे मतदार हे वेगवेगळे आहेत. परंतु, शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) हरल्याचा रंग दिला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीवर (MVA) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमरावती पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमध्ये आम्ही उत्तम प्रकारे लढलो आहोत. मात्र, भाजप हरली असा रंग दिला जात आहे. ते केवळ राजकीय रंग देण्याचा प्रकार आहे. अमरवातीमधील पराभवाबाबत आम्ही निश्चितपणे चिंतन करू, त्याचा अभ्यास केला जाईल. कारण त्याठिकाणी पराभव होता कामा नये, असे आम्हाला वाटत होतं. परंतु, अमरावतीमध्ये आम्ही मागे पडलो. हे आम्हाला मान्य करावेच लागेल.
कुणाल टिळक हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. कुणाल टिळक हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी प्रवक्ते व्हायलाच पाहिजे. त्यामुळे प्रवक्तेपद आणि कसबा पेठ पोटनिवडणूक उमेदवारी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याचा काहीही संबंध नाही. तर कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघात पोटनिवडणुकीतील उमेदवाराबाबत आज किंवा उद्या आमचं संसदीय मंडळ उमेदवार जाहीर करतील.