Kasba and Chinchwad Byelections : भाजपसाठी मुख्यमंत्री मैदानात; म्हणाले पोटनिवडणुकीत विरोध…

Kasba and Chinchwad Byelections : भाजपसाठी मुख्यमंत्री मैदानात; म्हणाले पोटनिवडणुकीत विरोध…

पुणे: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे (Kasba and Chinchwad by-elections) राज्यातील राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील मैदानात उतरले आहेत.

राजकारणातील परंपरा सांगत पोटनिवडणुकीत विरोध न करता त्या बिनविरोध करण्यात याव्या असं मत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी आपण विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलणं केलं असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं.

अंधेरी पोटनिवडणुकीत जशी बिनविरोध झाली होती त्याचप्रमाणे निवडणूक देखील बिनविरोध व्हावी, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान सर्व पक्षांनी आपली भूमिका ठाम असल्याचा पवित्रा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही एखाद्या मतदार संघातील आमदार सदस्यांचे निधन झाले, तर विभागात उमेदवार न देता ती निवडणूक बिनविरोध करण्याची आपल्या राज्याची संस्कृती आहे. त्यामुळे यावेळी कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी राजकीय पक्षांना केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube