Chinchwad By Election : उमेदवारीवरून जगताप कुटुंबियात वाद?

Chinchwad By Election : उमेदवारीवरून जगताप कुटुंबियात वाद?

पुणे : चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad By Election) कोणी लढवायची यावरून कैलासवासी लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबामध्ये वाद असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच अर्ज दिल्याने हा वाद असल्याचे बोलले जात आहे. तर भाजपच्या नेत्यांचा कल हा अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्याकडे असल्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

लक्ष्मण जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप (Shankar Jagtap) हे देखील विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यांच्या ऐवजी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी द्यावी, असा पक्षातील अनेक माजी नगरसेवकांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे शंकर जगताप यांनी आपल्याला राजकीय अनुभव असल्याने संधी मिळावी, असा आग्रह पक्षाकडे धरला आहे. त्यामुळे भाजपने देखील यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रितरित्या भाजप समोर आव्हान ठेवणार असतील तर भाजपसाठी ही निवडणूक सोपी नाही. त्यामुळेच भाजप सावधपणे पाऊल टाकत आहेत. भाजपच्या नेत्यांनी शंकर जगताप यांची समजूत देखील घातली आहे, असे सांगण्यात येत. अश्विनी जगताप असतील तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील मदत करणार असल्याचे बोलले जात आहे. अश्विनी जगताप यांच्या व्यतिरिक्त जर कोणी उमेदवार भाजपने दिला, तर मात्र बारणे हे वेगळी भूमिका घेऊ शकतात अशीही चर्चा आहे.

या साऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी देखील आपण रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. तलाठी यांनी गेल्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांना चांगली लढत दिली होती. ही जागा शिवसेना (Shivsena) लढवणार की राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) याचा देखील अद्याप निर्णय झालेला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube