Chinchwad Bypoll सचिन अहिरांकडून मनधरणी… राहुल कलाटे अर्ज मागे घेणार का?

Chinchwad Bypoll सचिन अहिरांकडून मनधरणी…  राहुल कलाटे अर्ज मागे घेणार का?

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Thakeray Group) बंडखोरी करणारे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांची समजूत काढण्यासाठी संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) हे स्वत: आले होते. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा याकरिता शिवसेनेचे दिग्गज नेते प्रयत्नशील आहेत. त्यापार्श्वभूमीवर राहुल कलाटे आता आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. तर सुरुवातीपासून इच्छुक असलेले शिवसेनेचे ठाकरे गटाचे राहुले कलाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कलाटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन सचिन अहिर आले होते. अहिर यांनी कलाटे यांची मनधरणी केली तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन बोलणे करुन दिल्याची माहिती आहे.

सचिन अहिर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना भेटण्यास आलो होतो. तुम्ही तरुण आहात. तुमचे राजकीय भवितव्य अंधारमय होऊ नये. आगामी काळात तुम्हाला राजकीय दृष्टीने मदत करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला राजकीय भविष्य असल्याने सकारात्मक निर्णय घ्यावा निरोप दिला आहे.

याबाबत राहुल कलाटे म्हणाले की, सचिन अहिर यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंशीही बोलणेही करुन दिले आहे. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांचा अनादर करणार नाही. मात्र, सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube