Chinchwad Bypoll राहुल कलाटेंनी मागितला पाठिंबा…’वंचित’ची भूमिका गुलदस्त्यात!

  • Written By: Published:
Rahul Kalate Prakash Ambedkar

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bypoll) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी वंचित बहुजन आघाडीकडे आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून पत्र पाठवले आहे. मात्र, अद्याप वंचित बहुजन आघाडीची (VBA) याबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असून स्पष्ट करण्यात आलेली नाही.

शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आधी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, महाविकास आघाडीत चिंचवड पोटनिवडणुकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना तिकीट जाहीर केले. त्यामुळे राहुल काटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

चिंचवड पोटनिवडणूक काही करून जिंकायची या इराद्याने राहुल काटे सध्या प्रचार करत आहेत. त्यामुळेच शिवसेनेशी नुकतीच युती केलेल्या पण महाविकास आघाडीचा घटक नसलेल्या वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंब्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना पाठिंब्या संदर्भातील पत्र राहुल कलाटे यांनी दिले आहे. मात्र, त्यावर अद्याप वंचित बहुजन आघाडीकडून उत्तर आलेले नाही.

Tags

follow us