जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा, CM शिंदेचं बहिणींना आवाहन

जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा, CM शिंदेचं बहिणींना आवाहन

Eknath Shinde : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladaki Bahin Yojna) राज्यस्तरीय शुभारंभ आज पुण्यातील बालेवाडी येथे झाला. या कार्यक्रमात उपस्थित महिलाना संबोधित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. त्यांनी सावत्र भाऊ असा विरोधकांचा उल्लेख करत योग्य वेळ आल्यावर या सावत्र भावांना योग्य जागा दाखवा, असं आवाहन केलं.

मला काय सांगायचं अन् तुमच्याकडून करून घ्यायचं; CM शिंदें बोलताच अजितदादा, फडणवीस हसलेच 

बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, मी जिथं जिथं जातो, तिथं मला लाडक्या बहिणी पैसे आल्याचं दाखवत आहेत. आज हा लाडक्या बहिणींचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. मी अनेक बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले. त्यांच्या डोळ्यात मला सरकारबद्दल आदर दिसला. प्रत्येकाला भाऊ-बहिणी असतात. मलाही एक बहीण आहे. पण लाडक्या बहिणीच्या रुपात मला लाखो बहिणी मिळाल्या, याचा आनंद आहे. महिलांच्या जीवनात आनंदाचे आणि समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची इच्छा असल्याचं शिंदे म्हणाले.

Marathi Movie: ‘पायवाटाची सावली’ चित्रपटातून उलगडणार एका लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास 

ते म्हणाले, आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना आणल्या. रोजगार प्रशिक्षण, कृषी पंप योजना आणली. आम्ही महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. असं शिंदे म्हणाले.

आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो. म्हणूनच आम्ही अनेकांना पुरून उरलोय. सावत्र, कपटी भावांवर मी मात करून इथपर्यंत आलो. त्यामुळे सावत्र भावांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. त्यांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा. सावत्र भाऊ खोटे आरोप करत आहे. लाडकी बहिण योजना कशी फसवी आहे, हा चुनावी जुमला आहे असं विरोधक म्हणत आहेत. माझ्या लाडक्या बहिणींबद्दल असं बोलताना जनाची नव्हे तर मनाची वाटायला पाहिजे. ही योजना बंद व्हावी म्हणून ते कोर्टात गेले. पण, न्यायालयाने त्यांना चपराक दिली. न्यायालयाने बहिणींच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा, अस आवाहन शिंदेंनी केलं.

1500 मध्ये काय होणार असे विरोधक म्हणत आहे. पण तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना दीड हजार रुपयांचं मोल काय समजणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

अजितदादा काय म्हणाले?
या योजनेत सातत्य टिकवायचं आहे. ते टिकवायचं की नाही, ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकववायचं असेल तर पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला संधी द्या, पुन्हा आम्हाला पाठबळ द्या. आम्ही कामाचे माणसं आहोत. शब्दाला पक्के आहोत. आम्ही वेळ मारून नेणारे नाही. आज 1 कोटी 8 लाख लोकांचे अर्ज मंजूर झाले. 1 कोटी 3 लाख लोकांना पैसे मिळाले. आम्ही जे बोलतो, ते करतो. त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. विरोधक टीका करततात. त्याकडे लक्ष देऊ नका, असं अजित पवार म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube