मला काय सांगायचं अन् तुमच्याकडून करून घ्यायचं; CM शिंदें बोलताच अजितदादा, फडणवीस हसलेच

मला काय सांगायचं अन् तुमच्याकडून करून घ्यायचं; CM शिंदें बोलताच अजितदादा, फडणवीस हसलेच

Eknath Shinde : ‘आता आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये भाऊबीज देतोय. वर्षाला अठरा हजार रुपये. ही योजना अशीच चालत राहणार. उद्या तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर सरकारची ताकद वाढली तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील. पावणे दोन हजाराचे दोन हजार होतील. पुढे अडीच हजार होतील. दादा (अजित पवार) तुम्ही त्यांना सांगा पैशांचा हिशोब. मला काय मला सांगायचंय आणि तुमच्याकडून करून घ्यायचं.. अडीच हजाराचे तीन हजार होतील असे म्हणताच व्यासपीठावर उपस्थित अर्थमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खळखळून हसले.

राज्य सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खोचक शब्दांत टोले लगावले. तसेच लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली.

त्यांना आता पोटदुखी, डोकेदुखी अन् कावीळ.. नीलम गोऱ्हेंचा विरोधकांवर घणाघात

शिंदे पुढे म्हणाले, मी तुम्हाला सांगू इच्छितो या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी बहिणीला पैसे मिळणार आहेत. आता मी पाहिलं की बऱ्याच बहिणींच्या बँक खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही येथून घरी जाईपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील हा मुख्यमंत्री म्हणून माझा तुम्हाला शब्द आहे.

या योजनेवर टीका करणाऱ्या सावत्र भावांकडे आजिबात लक्ष देऊ नका. या लोकांना माझं एकच सांगणं आहे माझ्या बहिणीच्या हिताच्या आड आलात तर गाठ माझ्याशी आहे. आम्ही काय फेसबूकवरून तोंडाला फेस येईल इतकी बडबड आम्ही कधी केली नाही. योजना सुरू झाली तशी विरोधकांना पोटदुखी, डोकेदुखी झाली आता त्यांना झंडूबाम कमी पडेल असं दुखणं झालं आहे. त्यामुळे त्यांचा विचार करून नका असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना केले.

एकनाथ शिंदेंनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन.. 110 जागांवर सुरु केली विधानसभेची तयारी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube