मुख्यमंत्र्यांची मोदींसमोर 400 पार’ची घोषणा! म्हणाले, पुणेकर विरोधकांची हवा काढणार

मुख्यमंत्र्यांची मोदींसमोर 400 पार’ची घोषणा! म्हणाले, पुणेकर विरोधकांची हवा काढणार

CM Eknath Shinde Speech In Pune Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात तीन ठिकाणी सभा घेतल्या. यामध्ये पहिली सभा सोलापूर, दुसरी सातारा आणि तिसरी सभा पुण्यात. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उमेदवार मुरलीधर मोहळ हेही उपस्थित होते. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली.

 

मोदी विरुद्ध गांधी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला आणि दुसरीकडे राहुल गांधी अशी लढाई आहे. त्यामध्ये स्वप्नातही विचारलं तरी कुणीही सांगेल की पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाहिजे आहेत. तसंच, यांनी विदेशात देशाची बदनामी केली असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला. त्याचबरोबर आपल्याला या दोघांपैकी कोण पंतप्रधान पाहिजे असा प्रश्नही शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना विचारला.

 

तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी

ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. येथे फक्त नरेंद्र मोदी यांची गॅरंटी चालते. बाकी लोकांची गॅरंटी फेल झालेली आहे असा आरोपही शिंदे यांनी केला. तसंच, विरोधकांकडे भ्रष्टाचार सोडता काही नाही. त्यामुळे येत्या 7 मे रोजी आपल्याला मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करायचं आहे असंही शिंदे म्हणाले.

 

समोरच्या उमेदवाराची हवा काढायची

यावेळी शिंदे यांनी पंतप्रदान यांनी अब की बार 400 पार ही घोषणा दिली आहे. त्यासाठी मतदान करायचं आहे. मोदी यांच्या सरकारने सुमारे 10 हजार गरिब कुटुंबाना गरिबीतून बाहेर काढलं असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला. तसंच, आज उमेदवार निवडायचा असेल तरी आपल्याला समोरच्या उमेदवाराची हवा काढून मोदींना पंतप्रधान करायचे आहे असंही ते यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube