दिल्लीनंतर आता पुण्यात आंदोलन; कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा

अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

News Photo   2026 06 10T161109.446

देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीची सगळीकडे चर्चा आहे. (Cockroach) नीट रीक्षेत झालेल्या गोधळांचा मुद्दा या कॉकरोच जनता पार्टीने उचलू धरला आहे. याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. आता कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकी काय घोषणा केली?

अभिजित दिपके यांनी आज (10 जून) पत्रकार परिषद घेतली. यावळी त्यांनी येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाईल, अशी घोषणा केली. आम्ही सध्या पुण्यात आंदोलन करत आहोत. आमच्यासोबत पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. आता लवकरच आम्ही या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देऊ, असे अभिजित दिपके यांनी सांगितले.

विशेष विश्लेषण : कॉक्रोच जनता पार्टी; भारतात नेपाळ-बांग्लादेश सारखी क्रांती घडवू शकेल का?

तसेच, कॉकरोच जनता पार्टी अस्तित्त्वात आली तेव्हा हे फक्त सोशल मीडियावरच असेल. दिल्लीत जमिनीवर आंदोलन करण्यासाठी कोणीही येणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु 6 जून रोजी पूर्ण जंतर-मंतरचे मैदान आंदोलकांनी भरलेले होते, असेही ते म्हणाले.

अभिजित दिपके यांनी देशभरातील पालकांना आवाहन केलं आहे. ‘तुमची मुलं सरकारला जाब विचारत असतील, राजकारणावर बोलत असतील तर तुम्हाला भीती वाटत असेल. माझ्या आईलाही भीती वाटत आहे. माझी आई तर तू परत येऊच नको, असं सांगत होती. हे तुला अटक करतील, तुझ्यावर हल्ला होईल, असं ती सागंत होती. परंतु, यावं लागेल. कोणालातरी बोलावंच लागेल, असं मी तिला सांगितलं. मी सगळ्या आई-वडिलांना सांगेन की तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबवू नका, असं दीपके म्हणाले.

मी एकटा बोलत असेल तर ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. परंतु लाखो, करोडो मुलं बोलतील तर कोणाचा आवाज दाबण्याची त्यांची हिंमत होणार नाही. तुरुंगात कोणाला जायचंच असेल तर मी जाईल. मी तुमच्या मुलांना तुरुंगात जाऊ देणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतो. परंतु, तुमच्या मुलांना बोलण्यापासून रोखू नका, असं आवाहन अभिजित दीपके यांनी केलं. तसंच, पुण्यातील आंदोलन हे जंतर-मंतरपेक्षा मोठं असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

follow us