सरकारला निवेदन पोहोचण्याआधीच मीडियाला पत्र पुरवल्याचा ठपका; डॉ. भगवान पवारांना नोटीस

सरकारला निवेदन पोहोचण्याआधीच मीडियाला पत्र पुरवल्याचा ठपका; डॉ. भगवान पवारांना नोटीस

Dr. Bhagwan Pawar News : पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार (Dr. Bhagwan Pawar News) यांनी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याविरोधात गंभीर आरोप केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीयं. तीन दिवसांत नोटीशीला उत्तर न दिल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही राज्य सरकारकडून देण्यात आलायं

Pune : अगरवाल पिता-पुत्राचा मस्तवालपणा कायम : पोलिसांना चौकशीत उडवाडवीची उत्तरे

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात डॉ. भगवान पवार यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्यावर गंभीर आरोप पवार यांनी केले होते. भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई का झाली? याबाबतचा खुलासा करणारं पत्र डॉ. पवार यांनी निलंबनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं. या पत्राद्वारे राज्य सरकारची बदनामी होत असल्याचं कारण देत राज्य सरकारने त्यांना नोटीस बजावलीयं.

प्रचाराची धामधूम शांत होताच मोदींचा पुढचा प्लॅन ठरला; कन्याकुमारीत करणार ध्यान

डॉ. पवार यांच्या पत्रानंतर राज्य सरकारने ही नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत भगवान पवार यांनी उत्तर न दिल्यास त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचा उल्लेख नोटीशीत करण्यात आलायं.

Panchayat 3 Leak: ‘पंचायत 3’च्या निर्मात्यांना मोठा धक्का; वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली लीक

दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दबाव टाकून निलंबनाची कारवाई केल्याबाबतच्या आरोपाची प्रत पवार यांनी राज्य सरकारला दिली होती. ही प्रत सरकारकडे 27 मे रोजी मिळाली होती. ही प्रत सरकारला मिळण्याआधीच निवेदनाच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. निवेदन पवार यांनीच माध्यमांना पुरवल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज