Pune : अगरवाल पिता-पुत्राचा मस्तवालपणा कायम : पोलिसांना चौकशीत उडवाडवीची उत्तरे
पुणे : कल्याणीनगर कार अपघात (Pune Car Accident) प्रकरणात अटक केलेल्या बिल्डर विशाल अगरवाल (Builder Vishal Aggarwal ) आणि त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल (Surendra Agarwal) यांचा मस्तवालपणा अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. पिता-पुत्र पोलीस तपासात सहकार्यच करत नसल्याचे समोर आले आहे. ड्रायव्हरचा मोबाईल आणि बंगल्यातील सीसीटीव्ही याबाबत दोघांनीही उडवाडवीची उत्तरे दिली असल्याचे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयाला सांगितले. (Builder Vishal Aggarwal and his father Surendra Aggarwal are not cooperating with the investigation.)
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघात झाल्यानंतर अगरवाल पिता-पुत्राने ड्रायव्हर गंगाधर याला बंगल्यामध्ये डांबून ठेवले होते. त्याचा मोबाईलही काढून घेण्यात आला होता. या मोबाईलबाबत पोलिसांनी विचारणा केल्यानंतर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, या चित्रीकरणासोबत छेडछाड झाल्याचे उघडकीस आले आहे. हे दोघेही पोलिसांना अजिबात सहकार्य करत नाहीत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
“चौकशीला आले होते की पार्ट्या झोडायला?” डॉ. सापळे समितीच्या बिर्याणी मेजवाणीवर धंगेकरांचा संताप
अल्पवयीन मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अगरवाल यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यातील सुरेंद्रकुमार अगरवाल याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली, तर विशाल अगरवालला या गुन्ह्यात सोमवारी रात्री पुन्हा अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही मंगळवारी एकत्रित न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयास दिली.
Kalyani Nagar Accident : ऑफिससमोर अपघात होऊनही माजी आमदार जगदीश मुळीक शांतचं!
या गुन्ह्याच्या अनुषंगाने दोघेही तपासात सहकार्य करत नाहीत. ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल जप्त करायचा आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केला. यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी दोघांना 31 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.