Kasba byelection: हिंदू महासंघाच्या एन्ट्रीने नवा ट्विस्ट; शैलेश टिळकांची घेतली भेट!

Kasba byelection: हिंदू महासंघाच्या एन्ट्रीने नवा ट्विस्ट; शैलेश टिळकांची घेतली भेट!

पुणे: भाजपाकडून (BJP) शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ब्राह्मण मतदारांची मोठी संख्या असलेल्या, कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये (Kasba byelection) हिंदू महासंघाकडून आनंद दवे हे निवडणूक अर्ज भरणार आहेत.

आरक्षणाच्या बाहेरचा ओबीसी समाज, त्याचबरोबर खुला प्रवर्ग, आणि ब्राह्मण समाजाची मतदार संख्या लक्षात घेता. आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे दवे यांनी सांगितलेला. तसेच कडवा हिंदुत्ववाद जपण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आज सायंकाळी भाजपवर नाराज असलेले शैलेश टिळक यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

दवे म्हणाले, भाजपाकडून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण ती मिळाली नाही. त्यामुळे ब्राह्मण मतदार नाराज झाला आहे. त्यामुळे आम्ही स्वर्गीय मुक्ताताईंचे आशीर्वाद घेतले व शैलेश टिळकांचे आशीर्वाद घेतले असून आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.

पुढे दवे म्हणाले की, भाजपने उमेदवारी घोषित केलेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे पाच वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मात्र, पाच वर्षात कसब्याला काहीही भेटले नाही. कसब्यामध्ये कुठलाही विकास झाला नाही, अशी टीकाही दवेंनी रासनेंवर केली.

त्यामुळे कसबा मतदारसंघातील मारवाडी, ब्राह्मण आणि खुल्या प्रवर्गाची जी मतदार संख्या आहे. ती आमच्या पाठीमागे उभे टाकतील आणि हिंदू महासंघ या ही निवडणूक जिंकेल, अशी अपेक्षा दवे यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, दवे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेत उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले. आता खरच दवे उमेदवारी अर्ज भरणार का की फक्त भाजपवर दबाव अण्णा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube