काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे भाजपमध्ये

  • Written By: Published:
Untitled Design (5)

पुणे – पिंपरी चिंचवड काँग्रेसला झटका..पिंपरी चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज अश्विनी जगताप यांच्या प्रचार सभेत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजप प्रवेश केला आहे. साठे हे गेली 7 वर्ष शहराध्यक्ष होते.

गेल्या वर्षी कैलास कदम यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष होता. शहर काँग्रेसमध्ये दोन गट कार्यरत होते. काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन देखील दोन करण्यात आले होते. तर वारंवार त्यांच्यात संघर्ष बघायला मिळत होता.

Aaditya Thackeray : खोक्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना जनता घरी पाठवणार! 

अखेर साठे यांनी ऐन मोक्याच्या वेळी काँग्रेस आणि अर्थात पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना झटका दिला आहे.

Tags

follow us