लोकप्रतिनिधी आहात जरा कायद्याने वागा; आम्ही कायद्यानेच वागतो, आजी माजी आमदार आमने-सामने
शिरूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू असताना विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात मतदान केंद्रामध्ये येण्यावरून बाचाबाची झाली.
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीदरम्यान (Election) विविध ठिकाणी नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार ज्ञानेश्वर कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्रात जाण्यावरून शाब्दिक वाकयुद्ध रंगलं.
शिरूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू असताना विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात मतदान केंद्रामध्ये येण्यावरून बाचाबाची झाली. विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्रात गेल्याने माजी आमदार अशोक पवार आक्रमक झाले. लोकप्रतिनिधी आहात, कायद्याने वागायला शिका, अशा शब्दात अशोक पवार यांनी आमदार कटके यांना सुनावलं. तसंच, निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही अशोक पवार यांनी केली.
कायदा महत्त्वाचा, CM फडणवीसांकडून कामकाजावर प्रश्न उपस्थित करताच, निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर
त्यावर कायद्याने वागण्याचा सल्ला आम्हाला देऊ नका, आम्ही कायद्यानेच लागतो, आम्ही काही चुकीचे केलेले नाही, असे प्रत्युत्तर कटके यांनी दिले. पराभव दिसायला लागताच पायाखालची वाळू सरकली काय? असा निशाणाही कटके यांनी पवारांवर साधला. मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत जाता येत नाही, असा कायदा असल्याचे सांगत आमदार अशोक पवार हे आक्रमक झाले. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे माजी आमदार अशोक पवारांनी म्हटले. त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीला शेवटच्या टप्प्यात गालबोट लागलंय.
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे २ डिसेंबर रोजी मतदान होऊन ३ डिसेंबरला निकाल लागणार होता. मात्र न्यायालयीन खटल्यांच्या पेचामुळे २४ नगरपरिषदांची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक पुढे ढकलण्याची करामत निवडणूक आयोगाने केल्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त करीत कडाडून टीका केली.
