Girish Mahajan यांचाही दावा… मी पहाटेच्या शपथविधीचा साक्षीदार, मलाही बऱ्याच गोष्टी माहिती

Girish Mahajan यांचाही दावा… मी पहाटेच्या शपथविधीचा साक्षीदार, मलाही बऱ्याच गोष्टी माहिती

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा वाद काही केल्या थांबतांना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या (BJP) नेत्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून डिवचण्याचे काम सुरु होते. त्यानंतर आता फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट नुकताच केला असून आता यात भाजपचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील मलाही पहाटेच्या शपथविधी बद्दल अनेक गोष्टी माहिती असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, अजितदादा यांच्यासोबत २०१९ ला झालेला शपथविधी हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारूनच झाला होता, असा मोठा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांनी देखील फडणवीसांना टोला लगावला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे तरीही असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही. कशाच्या आधारावर ते बोलले मला माहीत नाही’, असं म्हणतत शरद पवारांनी फडणवीसांनी केलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी फडणवीस हे सभ्य चेहऱ्यामागचा असभ्य माणूस असल्याची टीका केली.

दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत यावरून शरद पवारांसह विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, ‘जी वस्तुस्थिती आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. ते कधीही खोटं बोलत नाहीत. असे भंपक विधाने ते करत नाही. इतक्या वर्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी उद्धवजींची सेना काय म्हणते याला आम्ही अजिबात महत्त्व देत नाहीत’, अशा शब्दांत महाजनांनी आपले मत स्पष्ट केले.

पुढे बोलताना महाजन म्हणाले की, फडणवीस यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. ते त्या सगळ्या घटनेचे साक्षीदार आहेत. त्यांच्यासमोर सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या म्हणजे त्या सभ्य होतात का आणि तुम्ही काय केलं हे सांगितलं तर सभ्य होतात का?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे. मी देखील त्या सगळ्या चर्चेमधील एक भागीदार आहे. पहाटेचा ज्यावेळी शपथविधी झाला तेव्हा मी देखील त्या ठिकाणी होतो. त्यावेळेस भाजपच्या टीन नेत्यांमध्ये मी, दादा आणि देवेंद्रजी आम्ही तिघेही त्या ठिकाणी होतो. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहित आहेत, असाही खुलासा महाजनांनी केला.

वस्तुस्थिती सांगितली म्हणजे असभ्य होत नाही, त्यापेक्षा तुम्ही काय काय केलं हे एकदा पहा आणि अंतर्मुख व्हा. पण मला या गोष्टींचा गौप्यस्फोट करायचा नाही आमचे नेते देवेंद्र जे आहेत ते या गोष्टी बोललेले आहेत, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube