पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाकडून अतिमुसळधारचा अंदाज, वाचा कुठं कोणता अलर्ट?
Maharashtra Rain Update News : राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील प्रमुख शहर पावसाने झोडपून काढली आहेत. पुणे मुंबईत तर अतिवृष्टी झाल्याचं चित्र आहे. (Rain) दरम्यान, आणखीही हा मेघराज्या काही थांबण्याचं नाव घेत नाही. पुण्यात (Pune) अनेक परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांच स्तलांतर करण्याची वेळ आली आहे. हीच परिस्थिती मुंबईतही आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
कुठल्या भागात मुसळधार आज कारगिल विजय दिवस! पंतप्रधान युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात ऑरेंज अलर्ट
पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाच्या पाण्याचा मोठा फटका पुणे शहरासह लगतच्या गावांना बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आल आहे. यामुळे मुठा नदी पात्र देखील दुधडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, आजही पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शाळांना सुट्टी Pune Rains Update: पुन्हा रेड अलर्टचा इशारा, शुक्रवारीही पुण्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहणार
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २६ जुलै रोजी बंद ठेवाव्यात असं जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे.
मदत कार्य सुरू
एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. सिंहगड परिसरातील निंबजनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. सिंहगड परिसरातील या सोसायट्यांमध्ये पाणी साचलं होतं. त्यानंतर बचावकार्य सुरू केलं आहे. खडकवासल्यातून होणारा विसर्ग कमी केल्याने साचलेलं पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पीएमआरडीएचे पथक सर्वत्र मदत करण्यासठी कार्यरत आहेत.
उपमुख्यमंत्री पवारांच्या सूचना
- जेथे पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरले, तिथे टँकरद्वारे पुरवठा
- धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग नियंत्रित करून नियंत्रण
- बाधितांच्या घरी शिधा पोहोचविण्यात येईल
- स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरवा
- अतिवृष्टीत जखमी व्यक्तींचा उपचार खर्च शासनातर्फे
- नैसर्गिक संकटात स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे
- प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी द्यावे