Maharashtra Politics : ‘मुख्यमंत्री पदाबद्दल…’, अजित पवारांनी सांगितलं मनातलं गुपित !

Maharashtra Politics : ‘मुख्यमंत्री पदाबद्दल…’, अजित पवारांनी सांगितलं मनातलं गुपित !

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) नाव आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवता आले नाही. शरद पवारांसारखं (Sharad Pawar) दिग्गज नेतृत्व मिळूनही आलेल्या या अपयशावरून विरोधक राष्ट्रवादीला कायम डिवचत असतात. दरम्यान, २००४ साली विधानसभा निवडणुकीत (assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाने दवडली. २००४ साली मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं ही सर्वात मोठी चूक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

अजित पवार म्हणाले की, एक मात्र मोठी चूक वाटते ती म्हणजे २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडायला नको हवं होतं. मी खोटं सांगत नाही. आर आर पाटील, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचं होतं. किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात कोण होते त्यांना मुख्यमंत्री करायचं, पण २००४ ला जर मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादीकडे आलं असतं तर ते शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा अधिक होत्या, तरी मुख्यमंत्रिपद न घेण्याचा निर्णय कुणी घेतला हा सवाल विचारला असता, अजित पवार म्हणाले की, आम्ही तेव्हा ज्युनियर होतो. निर्णय प्रक्रियेमध्ये बोलणारे कोण होते तर प्रफुल्ल पटेल, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे आमचे सिनियर नेते होते. त्यांनी सांगायचं आणि आम्ही जी म्हणायचं, अशी परिस्थिती असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्रिपदाकरिता नशिबाची साथ आवश्यक असल्याचे देखील अजित पवार म्हणाले, आपण किती काही म्हटलं, तरी प्रयत्न करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. पण कुठेतरी नशिबाची पण साथ असावी लागते. सगळ्याच क्षेत्रात ती लागत असते. देशात पंतप्रधानपदाच्या योग्यतेची अनेक माणसं होती, पण सगळ्यांना ते पद मिळतं का ? अगदी महापौरपद असेल, मुख्यमंत्रिपद असेल, किंवा आणखी कोणताही पदं असेल. सगळ्याच ठिकाणी असं होतं. असं त्यांनी यावेळी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube