Kasaba By Election : ‘उमेदवारी अर्ज मागे घ्या, अन्यथा..; अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन

Kasaba By Election : ‘उमेदवारी अर्ज मागे घ्या, अन्यथा..; अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन

पुणे : ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) लेखी तक्रार दाखल केली. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला. या धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी अभिजीत बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली.

तक्रार दाखल करत अभिजीत बिचुकलेने लिहिलं आहे, ‘मी कसबा मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केल्यावर मला विरोधकांकडून अर्ज मागे घ्यावा, तसेच पुणे सोडून साताऱ्याला जावं आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुमचा खून करू, अशी धमकी देण्यात आली.

अभिजीत बिचुकलेने धमकीनंतर जीवाला धोका असल्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना तात्काळ संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घ्यावे. आचारसंहितेच्या दरम्यान असा प्रकार घडणं ही गंभीर बाब आहे, असंही अभिजीत बिचुकले म्हणाले.

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेने परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. बिचुकलेने कसबा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिजित बिचुकलेने उमेदवारी अर्ज भरल्याने ही पोटनिवडणूक खूपच मजेशीर होणार असल्याचे सांगितलं आहे.

अभिजित बिचुकले आणि लहुजी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात काल निवडणूक कार्यालयासमोर बाचाबाची झाली. अभिजित बिचकुले त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे हे लहुजी संघटनेचे उमेदवार अनिल हातगडे हे उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले असता या दोघांमध्ये बाचाबाची झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube