Kasba By Election : भाजपने गिरीश बापटांचा अपमानच केलाय, प्रशांत जगताप यांचा आरोप
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला (BJP) पाठिंबा दिला आहे. मनसेमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यासाठी ( Kasba By Election) इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या होती. मात्र असं असताना देखील मनसेने भाजपला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळली आहे. आता मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये (MNS) जोरदार जुंपल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या ५ वर्षात गिरीश बापटांना (Girish Bapat) भाजपने आणि त्यांच्या नेतृत्वाने त्यांना खड्यासारखे बाजूला ठेवले होते, पक्षाच्या कोणत्याही बैठकांमध्ये गिरीश बापटांना स्थान देण्यात आले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी यावेळी केला.
महानगरपालिकेच्या सर्वच निर्णय प्रक्रियेमध्ये कुठे देखील बापटांना विचारलं जात नव्हतं, त्यांच्या प्रकृतीबाबत घाणेरडे अफवा चर्चा करण्यात आल्या. त्याच्यामुळे स्वतः गिरीश बापट दुखावले गेले आहेत, आता सध्या देखील गिरीश बापट याना डावल्याचा प्रयत्न केला जात आहे, फक्त निवडणुकी पुरतेच गिरीश बापट यांची आठवण काढण्यात असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. पण आम्ही पुणेकरांच्यावतीने तुम्ही स्वतःच्या स्वर्थासाठी बापटांच्या आरोग्याशी खेळू नका, अशा प्रकारे एखाद्या नेत्याला आयुष्यभराच्या तपश्चर्या नंतर, ठराविक काळासाठी किंवा आपल्या प्रचारासाठी भाजप त्यांना प्रचारात आणत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
भाजपचा ‘घायाळ वाघ’ अखेर मैदानात
भाजपचे ( BJP ) पुण्याचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat ) यांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून खराब आहे. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहीत कसबा ( Kasaba) पोटनिवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. यावरुन गिरीश बापट हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे या भागात त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. बापट नाराज असल्याच्या चर्चेचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे आता थेट गिरीश बापट स्वत: या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत.