Kasba byelection : राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार जाहीर; ‘ही’ नावे आघाडीवर

Kasba byelection : राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार जाहीर; ‘ही’ नावे आघाडीवर

पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीवर (Kasba byelection) राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि मनसेकडून (MNS) या निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीकडून (NCP) संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आलीय.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली. कसबा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे माहविकास आघाडीतील इतर पक्षामध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित हालचाल दिसत नाहीये, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांकडून धरला गेला.

आजच्या बैठकीत एकूण दहा इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये अंकुश काकडे, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, रूपाली पाटील, शिल्पा भोसले, दत्ता सागरे या प्रमुख नावासह एकूण 10 इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवणार आहेत, असे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

मनसेला राज ठाकरेंच्या होकाराची प्रतिक्षा
कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकी संदर्भात मनसेची बैठक झाली. पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. या संदर्भात बैठका सुरू आहेत. जो निर्णय राज ठाकरे देतील त्याचे आम्ही पालन करु असंही पदाधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे.

काँग्रेसची डोकेदुखी वाढली
काँग्रेसकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 16 जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. या पोटनिवडणूकीसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या आज ऑनलाईन पद्धतीने झाल्या मुलाखती झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून १६ इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी श्रीनगर येथूल इच्छुकांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube