Anand Dave हिंदू महासंघ निवडणूक लढणार अन जिंकणारच… मुस्लिम मतांची गरज नाही!

Anand Dave हिंदू महासंघ निवडणूक लढणार अन जिंकणारच… मुस्लिम मतांची गरज नाही!

पुणे : कसबा पेठ मतदार संघ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत हिंदू महासंघ माघार घेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. आता माघार घेण्याचा प्रश्नच नाही. ज्यांचा हिंदू महासंघाच्या भूमिकेवर विश्वास आहे. ज्याला पुणेश्वर महादेव मुक्त करायचे आहे. तसेच ज्याला आर्थिक आरक्षण हवे आहे. अशा कोणीही मतदान केले तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण हिंदू सोडून मी मुस्लिम अथवा अन्य कोणत्याही मतदारांकडे मतं मागायला अजिबात जाणार नाही. टिळक कुटुंबाला (Tilak Family) भाजपने (BJP) उमेदवारी न दिल्याने हिंदू मतदार (Hindu Voter) नाराज झाले आहेत. भाजपला त्याचा तीव्रपणे फटका बसेल. या हिंदूंच्या मतांवर मी निवडणूक लढवत असून जिंकूनही येणार आहे, असा ठाम विश्वास हिंदू महासंघाचे (Hindu Mahasangha) अपक्ष उमेदवार आनंद दवे (Anand Dave) यांनी व्यक्त केला आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीतून आनंद दवे हे माघार घेणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्याबाबत खुलासा करताना हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले की, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. तसेच मी या पोटनिवडणुकीतून माघार घेत आहे. या चर्चामध्ये काहीही तथ्य नाही. त्या केवळ अफ़वा आहेत. मी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.

आनंद दवे म्हणाले की, मी हिंदू मतांवर निवडून येणार आहे. त्यामुळे मला मुस्लिम मतांची गरज नाही. त्यामुळे मी कोणत्याही मुस्लिम घरी किंवा अन्य कोणाच्या घरी मतं मागायला जाणार नाही. तर फक्त हिंदूच्या घरी मी प्रचार करण्यासाठी जाणार आहे. इतर ठिकाणी बिलकुल जाणार नाही.

पुण्येश्वर मुक्त करणे, आर्थिक आरक्षण लागू करण्याची मागणी, जुन्या वाडे, इमारतींचे संरक्षण कसे करता येईल, कसबा स्वच्छ कसे करता येईल, कसबा सुरक्षित करणे आदी विविध मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे. टिळक कुटुंबाला या मतदार संघात उमेदवारी न दिल्याने त्याचा फटका भाजपला बसेल. त्यामुळे हिंदू मतदार आम्हालाच मतदान करणार असल्याने या पोटनिवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचे आनंद दवे यांनी दावा केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube