Kasba Bypoll : ब्राह्मण समाजावर अन्याय, तिकीट न मिळाल्याने शैलेश टिळक म्हणाले…

  • Written By: Published:
Kasba Bypoll : ब्राह्मण समाजावर अन्याय, तिकीट न मिळाल्याने शैलेश टिळक म्हणाले…
  • Team Letsupp : (विष्णू सानप) 

पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमदेवार देण्याऐवजी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. पण तिकीट देण्यात आलं नाही. का दिलं नाही माहीत नाही? अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

ब्राह्मण समाजावर अन्याय

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “पुणे शहरात आज कुठलाही ब्राह्मण उमेदवार नाही. त्यामुळे ब्राह्मण समाजावर अन्याय झाल्याची भावना आहे आणि हीच भावना लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे.”

कोणताही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एखाद्याच्या घरातील व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. भाजपने कसबा निवडणुकीच्या बाबतीत मात्र याला बगल देत हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे चिंचवड मध्ये मात्र लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणूक मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आम्ही सांगितलं होतं की ताईंचे अर्धवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. आम्हाला अशा वाटतं होती की आम्हाला उमेदवारी मिळेल पण पक्षाने वेगळा विचार करून रासने यांना उमेदवारी जाहीर केले आहे पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि त्यांना शुभेच्छा आहेत

फडणवीस यांनी काल भेट झाली आणि यावेळी निवडणूक बद्दल चर्चा झाली. हा निर्णय दिल्ली वरुन होईल असे देखील त्यांनी सांगितले. ताई गेल्यानंतर त्यांनी आमची भेट फार कमी वेळासाठी घेतली होती म्हणून काल ते पुन्हा घरी आले होते. वर्षभराचा कालावधी आहे, घरच्या सदस्याला दिली असती तर बिनविरोध होण्याची शक्यता जास्त होती पण पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे.

तरीही पक्षासोबत राहणार

त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की “मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाला, असंही ते म्हणाले. तसेच आम्ही पक्षासोबतच राहू. काल देवेंद्र फडणवीस यांनी टिळक वाड्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी उमेदवारी देण्याबाबत काही निर्णय झाला नाही. दिल्लीतून निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं होतं.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube