Kasba-Chinchwad Bypoll भाजप पक्ष कुटुंबात भांडण लावणारा… टिळक-जगताप कुटुंबाने सावध राहावे!

Kasba-Chinchwad Bypoll भाजप पक्ष कुटुंबात भांडण लावणारा… टिळक-जगताप कुटुंबाने सावध राहावे!

पुणे : महाराष्ट्र राज्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघामध्ये (Kasba Peth-Chinchwad Bypoll) पोटनिवडणूक होत आहे. परंतु, या पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघांमध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळणार असल्याचे चर्चा होती. परंतु, भारतीय जनता पार्टीने (BJP) त्यांच्या कुटुंबाला सांगितला उमेदवारी मिळाली नाही. दुसऱ्याला उमेदवारी दिली आहे. चिंचवड मतदार संघामध्ये देखील लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी किंवा त्यांच्या भावाला सुद्धा उमेदवारी देऊ असे सांगितले होते. परंतु, त्यांच्यापैकी एकालाच उमेदवारी मिळाली असल्याचे समजत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा पक्ष फक्त जाती-जाती धर्मा-धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहे. त्यामुळे टिळक आणि जगताप कुटुंबाले यापुढे भारतीय जनता पार्टी पासून सावध राहावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केले आहे.

कसबा पोटनिवडणुकीमध्ये टिळक कुटुंबाला भाजपने फॉर्म आणायला सांगितले. परंतु, त्यांच्याच कुटुंबीयांपैकी एकाला प्रवक्ते पद दिले. परंतु, उमेदवारी दिली नाही. तसेच चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि त्यांचे भाऊ या दोघांना फॉर्म आणायला सांगितले. परंतु, उमेदवारी एकाला दिली. यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे की भाजपा पक्ष फक्त घरा-घरात, जाती-जातीत, धर्मा-धर्मात नाहीतर कुटुंबातसुद्धा भांडण लावण्याचे काम करतो. कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे भाजपा पक्ष भांडणे लावणारा पक्ष आहे. त्यामुळे टिळक आणि जगताप कुटुंबियांनी या भाजपापासून सावध राहावे, असे आवाहन सचिन खरात यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube